मिरज - पंढरपूर - मुंबई मार्गावर नवी साप्ताहिक एक्सप्रेस

संतोष भिसे
रविवार, 28 जुलै 2019

  • चाचणी तत्त्वावर दोन महिन्यांसाठी मिरज - पंढरपूर - मुंबई मार्गावर गुरुवारपासून ( ता. 1 ) नवी एक्सप्रेस
  • ही एक्स्प्रेस प्रत्येक गुरुवारी मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसमधून सुटेल तर शुक्रवारी मिरजेतून सुटेल.
  • या एक्स्प्रेसला शिवाजी महाराज टर्मीनस, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, पंढरपूर, कुर्डुवाडी, सांगोला, जतरोड, कवठेमहांकाळ व मिरज या स्थानकांत थांबा
  • बारा डब्यांच्या या गाडीचा एक आॅगस्ट ते 30 सप्टेंबर हा चाचणी कालावधी. 

मिरज - चाचणी तत्त्वावर दोन महिन्यांसाठी मिरज - पंढरपूर - मुंबई मार्गावर गुरुवारपासून ( ता. 1 ) नवी एक्सप्रेस सुरु होत आहे. ही एक्स्प्रेस प्रत्येक गुरुवारी मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसमधून सुटेल व शुक्रवारी मिरजेतून सुटेल.

या एक्स्प्रेसला शिवाजी महाराज टर्मीनस, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, पंढरपूर, कुर्डुवाडी, सांगोला, जतरोड, कवठेमहांकाळ व मिरज या स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.  एक आॅगस्ट ते 30 सप्टेंबर हा या गाडीचा चाचणी कालावधी आहे. तिला बारा डबे आहेत. मुंबई - गदग ही एक्सप्रेस ( क्रमांक 11139 व 11140 ) सध्या आठवड्यातून सहा दिवस धावते. उर्वरीत एका दिवसासाठी तिला याच क्रमांकानीशी मिरज - पंढरपूर - मुंबई मार्गावर सोडण्यात येणार आहे. हे अंतर 563 किलोमीटर आहे. देखभाल व दुरुस्ती मुबंईतच होईल. 

वेळापत्रक असे - मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसमधून प्रत्येक गुरुवारी रात्री नऊ वाजून 20 मिनिटांनी सुटेल. पुण्यात मध्यरात्री 1.05, कुर्डुवाडी पहाटे 4.10, पंढरपूर पहाटे 5.50, सांगोला सकाळी 6.10 व मिरजेत शुक्रवारी सकाळी 8.20 वाजता येईल. परतीच्या प्रवासात मिरजेतून शुक्रवारी संध्याकाळी 5.50, सांगोला 7.28, पंढरपुरात रात्री साडेआठ, कुर्डुवाडीत रात्री पावणेदहा, पुण्यात मध्यरात्री 1.25 व मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसला शनिवारी पहाटे 5.10 वाजता पोहोचेल.

यानिमित्ताने मिरजेतून पंढरपूर, पुणे व मुंबईसाठी आणखी एक जादा एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून तिचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. गणेशोत्सव, दसरा सणांच्या पार्श्वभूमीवर तिला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New weekly express on Miraj - Pandharpur - Mumbai route