मिरजेत मिशन चौकातील नव्याने बसविलेले सिग्नल बंदच 

शंकर भोसले  
Saturday, 21 November 2020

मिरज : शहरातील वाहतुक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणाचे नितांत गरज असते मात्र गेली अनेक वर्षे मिरजेतील सिग्नल यंत्रणा कोलमडली आहे.

मिरज : शहरातील वाहतुक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणाचे नितांत गरज असते मात्र गेली अनेक वर्षे मिरजेतील सिग्नल यंत्रणा कोलमडली आहे. याला जबाबादार रस्त्यांवरील अतिक्रमणे आहेत. शहरातील लोक प्रतिनिधींच्या बगल बच्चांनी रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमण केल्याने सिग्नल यंत्रणा कोलमडली आहे. 

शहरातील बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी मिरज वाहतुक शाखेचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी मिशन चौकातील सिग्नलसाठी पाठपुरावा करून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून घेतली. मात्र मिश्न चौकातील रूग्णालयासमोरील फुटपाथचे अतिक्रमणांमुळे सिग्नल यंत्रणा सुरू होऊ शकली नाही. 

मिरज मार्केट, शाहू चौक, स्टेशन चौक, मिशन चौक येथील वाहनांची गर्दी लक्षात घेता सिग्नल यंत्रणा गरजेची आहे. मात्र लोक प्रतिनिधींच्या उदासीन भुमिकेमुळे हे काम रखडले आहे. मार्केट परिसरात खाद्या गाड्यांच्या अतिक्रमणामुळे महाराणा चौकातील सिग्नल यंत्रणा हटविण्यात आली. तर शाहू चौक (हिरा हॉटेल अमर खड्डा) या चौकात सिग्नल यंत्रणेची नितांत गरज आहे. पाच रस्त्यांची एकत्रित आलेला हा चौक रोज एक अपघातास निमंत्रण देत असतो. 

तर स्टेशन चौकात प्रमुख बस स्थानक, रेल्वे स्थानक, छत्रपती शिवाजी रस्ता असल्याने या ठिकाणी शहरासह कर्नाटक, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातून येणा-या वाहन धारकांची संख्या अधिक आहे. येथे कायम वाहतुक कोंडी होते. तर सिग्नल आभावी सुसाट वाहनांमुळे अपघात घडत आहेत. 

सध्या मिशन चौकात नवी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र गेली वर्षभरापासून बंद अवस्थेत आहे. कारण या सिग्नल यंत्रणेस फुटपाथ वरील अतिक्रमणे आणि या ठिकाणी होणारे वाहन पार्किंग वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. येथील अतिक्रमणे न काढल्यास आणि सिग्नल पडल्यास वाहनांच्या रांगा या मिशन रूग्णालयाच्या गेट पर्यंत थांबून गेट पुर्णता बंद होण्याची शक्‍यात निर्माण होणार आहे. अतिक्रमणे काढण्यासाठी वाहतुक शाखेकडून महापालिकेस वारंवार पत्र व्यवहार झाला आहे. मात्र परिस्थिती जैसे थे आहे.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The newly installed signal at Miraj Mission Chowk is off