सोशल मीडियावरचे वृत्त खोटे; मायाक्का देवीची यात्रा रद्दच  

News on social media is false; Mayakka Devi's Yatra canceled
News on social media is false; Mayakka Devi's Yatra canceled
Updated on

लेंगरे : चिंचणी यात्रेला बैलगाड्या निघाल्याचे वृत्त दाखवून चिंचणी यात्रा सुरू आहे, असे वातावरण निर्माण करण्याचे काम सध्या सोशल मिडियावर सुरू आहे. मात्र, सोशल मीडियावर फिरणारे वृत्त खोटे आहे. 

महाराष्ट्रातील कोरोनाचे वाढत्या प्रभावामुळे कर्नाटक सरकारने यावर्षी चिंचणीची यात्रा रद्द केली आहे. भिकवडी बुद्रुक (ता. खानापुर) येथून गेलेल्या 38 बैलगाड्या आळते येथून परत गावी निघाल्या आहेत. तरी इथून पुढे कोणत्याही भाविकांनी चिंचणी जाऊ नये, यात्रेच्या मुख्य दिवशी असणारा नैवेद्याचा कार्यक्रम गावात करण्यात येणार असल्याने या महाप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन भिकवडी येथील भाविक विकास तामखडे यांनी केले आहे. 

महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर प्रशासनाने श्री मायाक्का देविचे मंदिर भक्तांसाठी बंद केले असून चिंचणी यात्रा रद्द करण्यात आली आहे. मंदिर परिसरात महाराष्ट्रासह सीमा भागातुन येणाऱ्या भक्तांवर कडक निर्बंध घातले आहेत. यामुळे श्री क्षेत्र मायाक्का चिंचणी कडे जाणारे सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला असून बैलगाड्यासह सर्वच दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी प्रवेश बंदी केली आहे.

 चिंचणी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना कर्नाटक सामेवरूनच परत पाठविण्यात येत आहे. कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना चोविस तासाच्या आत केलेल्या कोरोना टेस्टची सक्ती केली असून कोरोना अहवाल निगेटीव्ह असेल तरच प्रवेश देत आहेत.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com