
इस्लामपूर: महाराष्ट्र शासनाचा ‘उरुण- ईश्वरपूर’ असा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पवार यांनी सांगितले. उरुण-इस्लामपूर शहराचे ‘उरुण - ईश्वरपूर’ नामांतर करावे, यासाठी बेमुदत साखळी उपोषणास आज नववा दिवशी नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे. साखळी उपोषणाच्या नवव्या दिवशी उरुण परिसरातील पवार भाऊपणाच्यावतीने उपोषण करण्यात आले.