निपाणी : उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस यंत्रणा सज्ज!

निपाणी : उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज!

निपाणी: कोरोनानंतर दोन वर्षांनी उत्सवांची धामधूम सुरू आहे. येत्या काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, भगवान महावीर जंयती, हनुमान जयंती असून मुस्लिम धर्मांचा पवित्र रोजा महिना सुरू आहे. या उत्सवाच्या काळात संवेदनशील निपाणीत शांतता व सुव्यवस्था नांदावी. अफवा पसरविण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे येणारे सर्व सण-उत्सव, जयंत्या शांततेत साजरे करण्याचा प्रयत्न पोलिसांचा राहणार आहे.

कोरोना संकटामुळे जानेवारी २०२० पासून सलग दोन वर्षे कोणतेही सण, उत्सव, यात्रा, जत्रा, जयंती साजरे होऊ शकले नाहीत. राज्य व केंद्र शासनाने कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सार्वजनिक सण, उत्सव मर्यादित स्वरुपात साजरे करण्याचे आवाहन केले होते. मिरवणुका, सभा, जाहीर कार्यक्रमांवर बंदी घातली होती. त्यामुळे कोणत्याच धर्माचा सण-उत्सव या दोन वर्षांच्या काळात साजरे होऊ शकले नाहीत.

मर्यादित स्वरुपात घरी राहूनचे सण, उत्सव साजरे केले जात होते. यंदा मात्र बेळगाव जिल्ह्यासह निपाणी तालुका व परिसर पूर्णपणे कोरोना मुक्त झाला आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर निपाणी शहरातील सण, उत्सव साजरे होत आहेत. त्यातच सर्व धर्मियांचे उत्सव एकाच काळात आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. अफवांच्या बाजारात गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाली आहे.

निपाणी शहर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील शहर मानले जाते. त्यात सर्व धर्मियांचे उत्सव एकाच काळात आल्याने उत्सवाला समाजकंटकांकडून गालबोट लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मिरवणुकीत आक्षेपार्ह गीतावर बंदी आहे. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून सभा, मिरवणुकांमध्ये डीजे वाजविण्यावर बंदी आहे. याशिवाय आक्षेपार्ह गाणे लावणे, नारे दिल्यास किंवा बॅनरवर आक्षेपार्ह मजकूर लिहिणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दक्षतेच्या सूचना

दोन वर्षांच्या खंडानंतर सार्वजनिक स्वरुपात सण-उत्सव साजरे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण होऊ नये, म्हणून सर्व पोलिस यंत्रणांना दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

आगामी काळ हा उत्सवांचा असल्याने त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेतली जात आहे. संबंधितांना सूचना देवून दक्ष राहण्याबाबत आदेशित केले आहे. चिक्कोडी उपविभागात गुप्तचर यंत्रणा अलर्ट असल्याबाबतची माहिती दिली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जात आहे.'

-बसवराज यलीगार,पोलिस उपाधीक्षक, चिक्कोडी

Web Title: Nipani Police System Ready Backdrop Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..