निपाणीत उपनोंदणी महसूल वसुलीचे उद्दीष्ट कधी ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nipani Sub Registration Office

निपाणीत उपनोंदणी महसूल वसुलीचे उद्दीष्ट कधी?

निपाणी : २०२२-२३ अर्थिक वर्ष सुरु होऊन सव्वा महिना लोटला तरी येथील उपनोंदणी कार्यालयाला नवीन वर्षातील महसूल वसुलीचे उद्दीष्ट खात्याकडून मिळालेले नाही. परिणामी उद्दीष्टाविना येथील प्रशासनाला काम करावे लागते आहे. दरवर्षी एप्रिल अखेरपर्यंत महसूल वसुलीचे उद्दीष्ट मिळत होते, मात्र यंदा मे पंधरवडा झाला तरी उद्दीष्ट आलेले नाही. स्थानिक प्रशासन उद्दीष्टाकडे डोळे लावून बसले आहे.

येथील माणिकनगरमधील उपनोंदणी कार्यालय जमीन खरेदी-विक्रीचे मुख्य सरकारी केंद्र असल्याने महसूल रकमेची मोठी उलाढाल चालते. आत्तापर्यंत निपाणीसह चिक्कोडी व हुक्केरी तालुक्यातील ४८ गावांसाठी हे कार्यालय कार्यरत होते. मात्र आॅगस्ट २०२१ पासून हुक्केरी तालुक्यातील काही गावे कमी झाल्याने सध्या कार्यालयांतर्गत निपाणी व चिक्कोडी भागातील ३४ गावे समाविष्ट आहेत.

उपनोंदणी कार्यालय दरवर्षी ७ कोटीहून अधिक महसूल शासनाला मिळवून देते. कोरोना व लाॅकडाउनमुळे कार्यालयातील व्यवहार ठप्प झाले होते. मागील काही दिवसापासून व्यवहार पूर्वपदावर येताना दिसत आहेत. खात्याने २०२१-२२ सालासाठी ७ कोटी ५२ लाखाचे उद्दीष्ट दिले होते. मात्र कार्यालयाने तब्बल ९ कोटी २५ लाखाचा महसूल जमविला.

मावळत्या वर्षातील उद्दीष्टाचा कालावधी संपल्यावर पुन्हा नवीन अर्थिक वर्षात महसूल वसुलीचे नवीन उद्दीष्ट दिले जाते. मात्र यंदा खात्याकडून अद्याप उद्दीष्ट दिलेले नाही. यंदा निपाणी उपनोंदणी कार्यालय क्षेत्रातील हुक्केरी तालुक्यातील १४ गावे कमी झाली आहेत. आता केवळ ३४ गावांचा व्यवहार निपाणीतून चालत आहे. १४ गावांचा महसूल कमी झाल्याने यावर्षी किती महसूल वसुलीचे उद्दीष्ट मिळणार ? याकडे लक्ष आहे. दरवर्षी एप्रिल अखेरपर्यंत नवीन वर्षातील महसूल वसुलीचे उद्दीष्ट दिले जाते. यंदा अद्याप खात्याकडून उद्दीष्ट मिळालेले नाही. लवकरच ते प्राप्त होईल असे वाटते.

-एन. एन. कोरे, उपनोंदणी अधिकारी, निपाणी

Web Title: Nipani Sub Registration Office Revenue Collection Target Has Not Been Met By Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top