निपाणीत युवकाचा चाकुने खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खून

निपाणीत युवकाचा चाकुने खून

निपाणी: मूळगाव सैनिक टाकळी आणि सध्या रा. निराळे गल्ली, निपाणी येथील रहिवासी असलेल्या अभिषेक शिवानंद दत्तवाडे (वय १९) या युवकावर तिघा मित्रांनी धारदार चाकूने हल्ला करून त्याचा निर्घुण खून केला. रविवारी (ता. ३) मध्यरात्री येथे ही घटना घडली. याप्रकरणी खून करणाऱ्या एका आरोपीला शहर पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघे संशयित फरार झाले आहेत. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निपाणी शहर पोलिसांनी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अभिषेक हा मूळचा सैनिक टाकळी येथील रहिवासी असून त्याच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तो येथील चिक्कोडी रोडवरील मॅग्नम चित्रपटगृहात कामावर होता. तो आपल्या आईसह येथील निराळे गल्लीत एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतो. रविवारी दुपारी आपल्या आई समवेत तो मेतके येथील बाळूमामांच्या दर्शनासाठी गेला होता. त्यानंतर सायंकाळी चार वाजता चित्रपटगृहात त्याची ड्युटी असल्याने तो गेला होता.

रात्री साडेबाराच्या सुमारास तो चित्रपटगृहातील काम आटोपून आपल्या घरात प्रवेश करीत असताना दारातच दबा धरून बसलेल्या तिघा जणांनी आर्थिक व्यवहारातून बाचाबाची केली. पण भांडण टोकाला गेल्याने तिघांनी मिळून अभिषेकवर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे अभिषेक रक्ताच्या थारोळ्यात पडला.

यावेळी झालेल्या मारहाणीत अभिषेक हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक कृष्णवेनी गर्लहोसुर, ठाणे अंमलदार रमेश तळवार, हवालदार विनोद असोदे यांच्यासह यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची जादा कुमक मागवून परिसरात चोख बंदोबस्त ठेवला. त्यानंतर मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे. दरम्यान चिकोडी पोलिस उपाधीक्षक आणि बेळगाव येथील अतिरिक्त पोलिस प्रमुखांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिस ठाण्याजवळ अभिषेक त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी गर्दी केली होती.

Web Title: Nipani Youth Stabbed Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..