सांगली मनपा आयुक्तपदी नितीन कापडणीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

सांगली - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची बदली केली. त्यांच्या जागी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कापडणीस उद्या (ता. १९) महापालिकेची सूत्रे स्वीकारणार आहेत.

गेले काही महिने आयुक्त खेबुडकर आणि भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात बिनसले होते. मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपये निधी देऊनही कामे सुरू नाहीत. कामांच्या फायली अडवून ठेवतात. यामुळे नगरसेवक व पदाधिकारी नाराज होते. त्यातच विद्यमान आयुक्त खेबुडकर यांना सांगलीत तीन वर्षे पूर्ण झाली होती. तरीही त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळण्याची चर्चा सुरू झाल्यावर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच मुंबईत भेटून त्यांच्याबद्दल तक्रारींचा पाढा वाचला.

महापौर संगीता खोत, भाजपचे नेते शेखर इनामदार आणि पदाधिकाऱ्यांनी काल (ता. १७) मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीतच त्यांनी आयुक्त खेबुडकर यांची तातडीने बदली करण्याची मागणीही केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदली करण्याचे आश्‍वासन दिल्यावर २४ तासांतच आयुक्त खेबुडकर यांना बदलीचे आदेश निघाले.

महसूल व वन विभागाकडे मंत्रालयात त्यांची बदली करण्यात आली आहे. नूतन आयुक्त कापडणीस सध्या नागपूर महापालिकेचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी सांगली महापालिकेत मिरजेचे उपायुक्त म्हणून यापूर्वी काम केले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Kapadnis new commissioner of Sangli corporation