रुग्णालय हाउसफुल्ल; घरी उपचार घेणाऱ्यांची ना तपासणी, ना औषधे... 

शैलेश पेटकर 
Thursday, 13 August 2020

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणीक वाढ होवू लागली. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या आहेत.

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणीक वाढ होवू लागली. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत घरी उपचार (होम आयसोलेशन) केले जात आहेत. घरी उपचार घेणाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ना औषधे ना तपासणी यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना गेल्या महिन्यांपासून महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे. सध्यस्थितीत पालिका क्षेत्रात तीन हजारवर रुग्णसंख्या झाली आहे. दररोज किमाम दीडशे-दोनशेच्या पटीत रुग्ण आढळून येत आहे. यामुळे शहरातील रुग्णालय हाउसफुल्ल झाली आहेत. म्हणूनच प्रशासनाने प्रकृती स्थिर असणाऱ्यांवर घरीच उपचार (होम आयसोलेशन) करण्यास सुरूवात केली आहे. 

घरी उपचार घेणाऱ्या एका रुग्णाने नाव न टाकण्याच्या आटीवर सांगितले, की चार दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील साऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. साऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांच्यावर घरीच ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. चार दिवस उलटून गेले, तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा औषधे देण्यात आलेली नाहीत. महापालिकेचे आरोग्यपथकही याठिकाणी फिरकलेले नाही. 

प्रशासनाच्या कारभाराचा हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अशाच पद्धतीने गावभाग, विश्रामबाग, खणभाग परिसरातील हॉटस्पॉटमध्ये दिसून येत आहे. किमान दिवसातून एकदा तरी तपासणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No check-ups, no medicines for those taking home treatment ...