शिवसेनेत गटबाजीला वाव नाही : निलम गोऱ्हे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

शिवसेनेत गटबाजीला स्थान नाही. बंडखोरांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल असे शिवसेनेत्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी गुरुवारी सोलापुरात सांगितले. 

सोलापूर : शिवसेनेत गटबाजीला स्थान नाही. बंडखोरांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल असे शिवसेनेत्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी गुरुवारी सोलापुरात सांगितले. 

शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत आणि समन्वयक शिवाजी सावंत यांच्याविषयी असलेल्या नाराजीबाबत प्रश्‍न विचारल्यानंतर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी अधिक बोलणे टाळले. याविषयी अधिक बोलण्यास सावंत बंधू समर्थ आहेत. तेच बोलतील असे त्या म्हणाल्या.

महेश कोठे शिवसेनेत नवीन होते, तेव्हा त्यांना पक्षाने काय स्थान दिले हे सर्वांना माहिती आहे. त्यांच्यामुळे जुन्या लोकांना डावलले तेव्हा त्यांना वेदना झाली असेल? असा सवाल करून त्यांनी बंडखोरी केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर आणि समर्थकांवर पक्षाकडून कारवाई होईल असे सांगितले. 

कोठेंविषयी अधिक प्रश्‍न विचारल्यानंतर गोऱ्हे यांनी बोलणे टाळून आता हे कोण कोठे असा प्रश्‍न विचारायला लावू नका असे म्हणून पत्रकारांना गप्प केले. येत्या 14 ऑक्‍टोबर रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने राजकीय इच्छाशक्ती संपवली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनावर पुष्पवृष्टी केली यावरही त्या बोलल्या. शिवशक्ती-भिमशक्तीची भूमिका आजही कायम आहे. ज्यावेळी महायुतीची घोषणा झाली तेव्हाच महाराष्ट्रवर भगवा फडकला आहे, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no internal dispute in Shivsena says Neelam Gorhe