मृग, आद्रा नक्षत कोरडी; पाखरे वेचताहेत बीया... शेतकऱ्यांची चिंता वाढली 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

यंदा पावसाची सरासरी नव्हे तर त्यापेक्षा अधिक पावसाच्या अंदाजाने चकवा दिला आहे. मृग, आद्रा दोन्ही नक्षत्रात पुरेसा पाऊस बरसलाच नाही.

सांगली : यंदा पावसाची सरासरी नव्हे तर त्यापेक्षा अधिक पावसाच्या अंदाजाने चकवा दिला आहे. मृग, आद्रा दोन्ही नक्षत्रात पुरेसा पाऊस बरसलाच नाही. रविवारपासून पुनवसु नक्षत्र ( तरणा पाऊस) सुरु झाले आहे. या नक्षत्रातही हवामान खात्याचा समाधानकारक पावसाचा अंदाज नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढला आहे. गेली दोन दिवस ढगाळी वातावरण आणि रिमझिम पाऊस काही ठिकाणी होत आहे. पावसा अहावी पेरणी झालेल्या बीया पाखरे वेचून खात आहेत. पाण्याची सोय नसलेले शेतकऱ्यांच्या बीयाणे, खते, मशागतीचा खर्च वाया जाण्याची शक्‍यता आहे. सरासरीपेक्षा अदिक पावसाची टक्केवारी दिसत असली तरी दोन पावसातील अंतरामुळे पिके धोकादायक परस्थितीत आहेत. 

यंदा चांगल्या पावसाचे संकेत असतानाही मृगाच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात शिराळा तालुका वगळता जेमतेम पाऊस झाला होता. जिल्ह्यात खरीपाच्या सरासरी पेरणी 75 टक्केवर गेली आहे. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. यंदा पावसाचे अनुमान हवामान विभागाने जाहिर केल्यानंतर शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण होते. प्रत्यक्षात पेरणीनंतर मात्र पावसाची प्रतिक्षा करावी लागते आहे. दोन पावसातील अंतर ही पावसाची दरवर्षीची समस्या यंदाही पाठ सोडण्याची चिन्हे दिसत नाहीत. जुन, जुलैत कमी तर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्‍यता आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र 3 लाख 40 हजार हेक्‍टर आहे. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणि 1 जूनपासून आजअखेर पडलेला पाऊस असा- मिरज 0.4 (129.7), तासगाव 2 (137.9), कवठेमहांकाळ 1.6 (207.3), वाळवा-इस्लामपूर 5.5 (168.8), शिराळा 14.8 (375.6), कडेगाव 4.2 (159.4), पलूस 3 (124.4), खानापूर-विटा 2 (239.0), No Rain; Birds are eating seeds ... Farmers are worriedआटपाडी 0.0 No Rain; Birds are eating seeds ... Farmers are worried(153.3), जत 0.0 (79.8). 

धरणसाठा...  ( टी.एम.सी.मध्ये) 

  • वारणा, 15.44 
  • कोयना, 34.37 
  • धोम, 5.74 
  • कन्हेर, 2.65 
  • उरमोडी, 5.41 
  • अलमट्टी, 73.41 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Rain; Birds are eating seeds ... Farmers are worried