ऊस टोळी अभावी ऊस वाळू लागले: कारखान्याकडे यंत्रणा नसल्याचा परिणाम 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

आवकाळाशी झगडता झगडता नाकी आले असताना ऊसाला तोड वेळेत मिळत शेतकरी चांगलेच हतबल झालेत. फेंब्रुवारी उजाडत आली तरी ऊसाला कारखान्याकडून तोड मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आलेत.

लेंगरे : आवकाळाशी झगडता झगडता नाकी आले असताना ऊसाला तोड वेळेत मिळत शेतकरी चांगलेच हतबल झालेत. फेंब्रुवारी उजाडत आली तरी ऊसाला कारखान्याकडून तोड मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चांगलेच मेटाकुटीला आलेत. कार्यक्षेत्रातील दीड महिना उशीरा धुराडी पेटल्याने कारखान्याकडील अपुरी पडली आहे.

कर्नाटकात ऊसतोडीसाठी रक्कम जास्ती मिळत असल्यामुळे, उशिरा कारखाने सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस टोळ्या कर्नाटक राज्यात गेल्याने परिसरातील कारखान्याकडे टोळीची यंत्रणा अपुरी पडली आहे. त्यामुळे ऊसाला तोड मिळविण्यासाठी कारखान्याकडच्या यंत्रणेकडे मनधरणी करावी लागत असल्याने ऊसाला तोड मिळेल का नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

लेंगरे, भूड, मादळमुठी, देविखिंडी, वेजेगांव, माहुली, नागेवाडी, भाग्यनगर, साळशिंगे परिसरात टेंभूचे पाणी फिरल्याने या भागात ऊसाची लागण मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आडसाली ऊसाची लागण जास्त लागण करण्यात आली आहे. ऊसाचे पिकही जोमात आले होते. परतीच्या पावसामुळे ऊस उत्पादकांचे कबरंडे मोडले. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने ऊसाला तुरे येण्यास सुरुवात झाली आहे. ऊसाचे शेत कापसाच्या शेतासारखे पांढरेशुभ्र दिसू लागले. ऊस तोडण्यास टोळीत मिळत नसल्याने ऊस वाळू लागल्याने वजनात घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. 

यशवंत, विराज खांडसरी, उदगिरी या तीन कारखान्यांपैकी केवळ उदगिरी, विराजचे धुराडे पेटले आहे. गेल्या हंगामाप्रमाणेच यशवंत शेतकऱ्यांना तारेल अशी आशा होती. हा कारखाने सुरु न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले. परंतु चालू हंगामात क्षेत्रातील दोन कारखाना सुरु झाल्याने ऊस तोड केंव्हा मिळेल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहेत. 

विराज कारखाना वेळेपेक्षा उशीरा सुरु झाला. ऊस टोळी, वाहतूक यंत्रणा कमी असल्याने अडचणी वाढल्या आहे. कार्यक्षेत्राव्यतिरिक्त गोपूज, डोंगराई कारखान्यांनी बिले अदा न केल्याने शेतकऱ्यांनी या कारखान्यांकडे पाठ फिरवली. या सुरु असलेल्या कारखान्याकडून येत असलेल्या ऊस टोळ्याचे लाड पुरवता पुरवता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येऊ लागले. 

अवकाळी, महापूर यामुळे उसाला फटका बसला. तरी कारखानदारांवर कोणताही फरक पडलेला नाही. अस्मानी संकटाचा त्रास शेतकऱ्यांच्या पदरी पडला. त्यातच ऊसदराची कोंडी न फुटल्याने दर काय मिळणार या विषयीही संभ्रमावस्था आहे. तोड मिळवण्यासाठी गावपुढाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत फिंल्डीग लावून शेतकऱ्यांनी टोळ्या आणल्या. परंतु सामान्य शेतकऱ्यांना वाली कोण असा प्रश्न शेतकऱ्यांना पडण्यास सुरुवात झाली.

त्यातच शेती अधिकारी, चीट बॉयला यांच्याशी संर्पक करून लहान शेतकऱ्यांनी विंनंती केली तरी सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी यासगळ्या समोर हतबल झालेत. विराज खांडसरीचे उशीरा गाळप सुरु झाले. तरी गुळ पावडर बरोबरच यंदा साखरचे उत्पादन सुरु केल्याने ऊसाला तोड मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No sugarcane cutting gangs, sugarcane begin dry