मास्क न लावता फिरणाऱ्याना चार हजार दंड

MASK
MASK

आटपाडी : आटपाडीसह काही गावात विनाकारण तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या 18 जणावर आटपाडी पोलिसांनी कारवाई केली. त्यांना न्यायालयाने प्रत्येकी चार हजार प्रमाणे दंड केला.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी लागू केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावूनच पडावे अन्यथा कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याची आटपाडी पोलिसांनी तातडीने अंमलबजावणीही सुरू केली आहे.

आटपाडी शहरात तसेच बेरगळवाडी, घाणंद,महाडिकवाडी, कटरेवस्ती, दिघंची या भागात विनाकारण तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या 18 जणावर कारवाई केली. त्यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या सर्वांना प्रत्येकी चार हजार रुपये न्यायालयाने दंड सुनावला आहे. या घटनेची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com