जिल्ह्यात उपचारविना तडफडू लागले नॉन-कोविड रुग्ण

शामराव गावडे 
Monday, 7 September 2020

कोरोनाच्या संशयामुळे नॉन-कोविड रुग्णाची फरफट सुरू आहे. ते उपचारविना तडफडू लागले आहेत. त्यांच्यावरील उपचार गरजेचे आहेत. संपूर्ण जिल्हा कोरोनाने ढवळून निघाला आहे.

नवेखेड : कोरोनाच्या संशयामुळे नॉन-कोविड रुग्णाची फरफट सुरू आहे. ते उपचारविना तडफडू लागले आहेत. त्यांच्यावरील उपचार गरजेचे आहेत. संपूर्ण जिल्हा कोरोनाने ढवळून निघाला आहे. रोज वेगवेगल्या गावात कोरोना चे रूग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. अनेकजण दगावले आहेत. नॉन कोविड रुग्ण उपचारासाठी बाहेर पडले तर त्यांच्यासाठी रुग्णालयाने उपचारासाठी आपले दरवाजे बंद केले आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामध्ये इतर आजारी रूग्णांचे हाल होत आहेत. आधी कोविडची टेस्ट करून या मग उपचार करू असा सूर डॉक्‍टर लोकांनी आळवायला सुरवात केली आहे. कोविड टेस्ट करायला रुग्णाची व नातेवाईकांची ना नाही परंतु त्या साठी दोन ते चार दिवस जात असल्याने मूळ आजार बळावत आहे. व त्यावर वेळीच उपचार न झाल्याने हे रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. अगदी किरकोळ आजाराने आजारी असलेल्या रुग्णाना ही याचा फटका बसला आहे. तसेच आजारी रुग्णाची कोविड टेस्ट केली. व त्यातील एखादी टेस्ट पोझिटीव्ह आली तर कोविडच्या उपचारांना सुरवात केली जाते.

मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यातूनही रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. नवेखेड, बोरगाव परिसरात अशा घटना घडल्या आहेत. कोविड महामारीच्या विरोधात प्रशासन, डॉक्‍टर, इतर सेवक झटत आहेत. हे जरी खरं असलं तरी नॉन कोविड ची तपासणी करने ही त्यांची जबाबदारी आहे. कोविड रुग्ण हाताळताना जी खबरदारी घेतली जाते. तीच खबरदारी रेग्युलर चे रुग्ण हाताळताना घ्या परंतु त्यांच्यावरील उपचार बंद करू नका अशी मागणी लोकांच्यामधून होत आहे. 

गावोगावी नॉन कोविड रुग्णाची तपासणी अत्यावश्‍यक बनत चालली आहे.त्यांच्यावरील उपचार वेळेत व्हावेत. 
- कार्तिक पाटील, संचालक राजारामबापू साखर कारखाना. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non-covid patients started suffering without treatment in the district