लॉकडाऊन ट्रेंड ः नथीचा नखरा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

नऊवारी साडी, आंबाडा, त्यात मोगऱ्याचा गजरा आणि नाकात नथ हा मराठमाळा "लूक' आणि त्यावर एक भन्नाट सेल्फी तर बनती है यार ! 

सांगली ः नथ... मराठमोठ्या साजसृंगारातील महत्वाचा दागिना. स्त्रीचे सौंदर्य खुलवणारे अनमोल आभूषण... नऊवारी साडी, आंबाडा, त्यात मोगऱ्याचा गजरा आणि नाकात नथ हा मराठमाळा "लूक' आणि त्यावर एक भन्नाट सेल्फी तर बनती है यार ! 

आता ही सेल्फी आपल्या मोबाईलच्या गॅलरीत राहून काय उपयोगाची. ती शेअर तर झालीच पाहिजे आणि त्यावर लाईकचा पाऊसही पडला पाहिजे. मग काय, कुणातरी अशाच एका "सेल्फी क्वीन'च्या मनात आले अन्‌ तिने फेसबूकवर नवा ट्रेंड जन्माला घातला... त्याचं नावं "नथीचा नखरा'. आता हा ट्रेंड इतका व्हायरल झालाय की बोलायची सोय नाही. हजारो महिला, मुलींनी या लूकमधले फोटो शेअर केले आहेत. लहान मुलींचे फोटो तर शोधून शोधून अपलोड केले जात आहेत. 

कोरोना प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन... गेले दोन महिने सारे घरात आहेत. सारे मोबाईलला गळ्यात अडकावून फिरताहेत. रोजचा दीड जीबी डाटाही कमी पडतोय. कारण, गेल्या दोन महिन्यांत वेगवेगळ्या ट्रेंडनी साऱ्यांनी वेडं करून टाकलंय. त्यातील "छोटीशी प्रेमकथा', "जुने फोटो' हे ट्रेंड खूप चालले. जुन्या फोटोंवर कमेंट बॉक्‍समध्ये पडलेल्या उखाण्यांनी तर धिंगाणा घातला. हे ट्रेंड आता कुठे विसरायला झाले होते, तोच "नखीचा नखरा' चर्चेत आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nose ring trend on facebook