ढालगावला बंद दवाखान्यांवर चिटकवली कारवाईची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

ढालगाव (सांगली)- आपत्ती काळात देखील येथील सहा ते सात खासगी दवाखाने बंद आहेत. या दवाखान्याच्या दरवाज्यावर ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हाअधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशाने नोटीस चिटकवण्यात आली आहे. 

ढालगाव (सांगली)- आपत्ती काळात देखील येथील सहा ते सात खासगी दवाखाने बंद आहेत. या दवाखान्याच्या दरवाज्यावर ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हाअधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशाने नोटीस चिटकवण्यात आली आहे. 

ढालगाव व परिसर कवठेमहांकाळच्या पुर्व भागात दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. परिसरातील ढालगाव हे वीस ते पंचवीस खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. ढालगावात सहा ते सात खासगी दवाखाने आहेत. कोरोनाच्या भितीने आठ दिवसापासून हे सर्व दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत. संबंधित डॉक्‍टर "नॉट रिचेबल' झाले आहेत. ढालगाव परिसरातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी लांब अंतरावर जावे लागत आहे. मात्र संचारबंदीमुळे त्यांना दूरवर जाता येत नाही. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. 

नुकतेच जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी खासगी दवाखाने बंद ठेवल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्याच संदर्भान्वये ढालगाव ग्रामपंचायतीने बंद असलेले दवाखाने तातडीने उघडा अन्यथा ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा दाखला देण्यात येणार नाही, अशी नोटीस दवाखान्याच्या दरवाज्यावर चिटकवण्यात आली आहे. त्याची प्रत तहसिलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांना देण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice of action taken at the closed hospitals in Dhalagaon