सोलापूर - भिमा सहकारी साखर कारखान्याला नोटीस

चंद्रकांत देवकते
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मोहोळ (सोलापूर) - तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याने २०१७ -१८ मधील एफ.आर.पी प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्याला देणे असलेले १२ कोटी ६३ लाख ३३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अशा आशयाची  जिल्हाधिकारी यांनी काढलेली नोटीस मोहोळ तहसीलदार यांनी शुक्रवार ता.१० रोजी भिमा कारखान्याच्या प्रशासनाला टाकळी सिंकदरचे गाव कामगार तलाठी सिद्धापा कोळी यांच्या मार्फत दिली.

भिमा सहकारी कारखान्याने २०१७ -१८ च्या गळीत हंगामात चार लाख अकरा हजार आठशे श्याहत्तर मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ मधील ३(३) या तरतुदीनुसार १४ दिवसाच्या आत एफ.आर.पी. होणारी रक्कम ऊस उत्पादकाला अदा करणे बंधनकारक आहे. त्या रकमेस विलंब झाल्यास त्या कालावधीतील देयकाबाबत कलम ३ (३ ए) नुसार न दिलेल्या रकमेवरती व्याज देणे बंधनकारक आहे. त्यानुसार ३१ -७ -२०१८ अखेरच्या ऊसदेय बाकी अहवालानुसार कारखान्याकडे ऊसाचे निव्वळ बारा कोटी त्रेसट्ट लाख तेहतीस हजार येणे बाकी आहे. त्यामुळे कारखान्याने ऊस निंयत्रण १९६६ मधील तरतुदीचे उल्लंघन केले आहे.  

जिल्हाधिकारी यांनी संबधित भिमा कारखान्याची एफ.आर.पीची थकीत रक्कम वसुली करीता नोटीस काढली होती. सदरची नोटीस ता .१० रोजी तहसीलदार किशोर बडवे यांनी  बजावली असुन, सात दिवसाच्या आत सदरची रक्कम न भरल्यास आपल्या विरूद्ध महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६च्या कलम १७४ अन्वये उक्त थकबाकीच्या एक चर्तुतांश पेक्षा अधिक नसले इतक्या अतिरिक्त शास्तीसह येणे रकमेचे वसुलीकरीता कायदेशीर सक्तीची कारवाई करण्यात येईल. 

तसेच कसुरदाराकडे असलेल्या संपत्तीची माहीती एकत्र करून सदरची रक्कम मुदतीत न भरल्यास त्यांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव करून रक्कम वसुल केली जाईल. असे नोटीसीत नमुद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे संपुर्ण मोहोळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to Bhima Co-operative Sugar Factory