हलशीवाडीत वाट चुकुन गावात आले चितळ कुत्र्यांनी केला हल्ला अन्

मिलिंद देसाई
Friday, 14 August 2020

युवकांच्या प्रयत्नामुळे वाचले चितळाचे प्राण, स्वतःचा जीव धोक्यात घालून केला कुत्रांपासून बचाव 

बेळगाव : वाट चुकुन गावात शिरलेल्या चितळावर कुत्र्यांनी हल्ला चढविला मात्र गावातील युवकांनी स्वत: चा जीव धोक्‍यात घालीत चितळाला जिवदान दिले आहे. तसेच युवकांनी तातडीने पशु वैद्यकीय डॉक्‍टरांना बोलवुन जखमी चितळावर औषधोपचार केल्याने चितळाचे प्राण वाचले आहेत. 

हलशीवाडी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी शाळेजवळ चितळ ग्रामस्थांना दिसुन आले. याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ शाळेजवळ येईपर्यंत कुत्रांनी चितळावर हल्ला केला त्यामुळे घाबरलेले चितळ जमिनीवर पडुन ओरडत होते. त्यानंतर अर्जुन देसाई, दिनेश देसाई, नरसिंग देसाई, साईश सुतार, संतोष देसाई आदींनी कुत्रांच्या अंगावर जात त्यांना पिटाळुन आले. मात्र कुत्रांच्या हल्लात चितळ जखमी झाल्याने ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना माहिती देऊन पशु वैद्यकीय डॉक्‍टरांना बोलावुन घेतले. त्यामुळे चितळावर वेळेत उपचार झाले. 

हेही वाचा- ‘सकाळ’ स्टिंग ऑपरेशन : अन्य रुग्णांचा हकनाक बळी -

गेल्या काही दिवसांपासुन हलशीवाडी, गुंडपी, भांबार्डा, मेंढेगाळी, हत्तरवाड आदी गावांमध्ये जंगली डुक्‍कर, गवे यासह इतर प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्‌या प्रमाणात नुकसान होत असुन शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे वन खात्याने जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांमधुन होत आहे. मात्र वन खात्याचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे. 

हेही वाचा-‘मी चुकूच शकत नाही,  शौमिका यांच्या टि्वटची राजकीय क्षेत्रात चर्चा -

गेल्या काही महिन्यांपासुन हलशीवाडीसह गुंडपी, हलशी, हत्तरवाड आदी भागात जंगली प्राण्यांचे येणे जाणे वाढले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शुक्रवारी गावातील शाळेजवळ चितळ दिसुन आल्यानंतर कुत्रांनी त्याच्यावर हल्ला चढविला यावेळी युवकांनी वेळीच कुत्रांना दुर केल्याने चितळाचे प्राण वाचले आहेत. 
अर्जुन देसाई, ग्रामस्थ हलशीवाडी

संपादन - अर्चना बनगे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of animals increased in Wild pigs cows in villages like Halshiwadi Gundpi Bhambarda Mendhegali Hattarwad