रुग्ण वाढल्याने मिरज तालुक्‍याला धोका वाढला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

सांगली, ः मिरज तालुक्‍यातील पूर्व भागात नव्याने सात रुग्ण मिळून आले. त्यापैकी शहरातील अमननगरातील 52 वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. तर मिरज पूर्व भागात नव्याने सात रुग्ण मिळून आले. भारतनगर, अमननगर, रेवणी गल्ली, वाळवे गल्ली, सुंदरनगर येथे रुग्ण मिळून आले आहेत.

सांगली, ः मिरज तालुक्‍यातील पूर्व भागात नव्याने सात रुग्ण मिळून आले. त्यापैकी शहरातील अमननगरातील 52 वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. तर मिरज पूर्व भागात नव्याने सात रुग्ण मिळून आले. भारतनगर, अमननगर, रेवणी गल्ली, वाळवे गल्ली, सुंदरनगर येथे रुग्ण मिळून आले आहेत.

तालुक्‍यातील व्यंकोचीवाडी (शिपूर) व शिंदेवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडले आहेत. सांगली शहरातील शामरावनगर येथेही एक रुग्ण मिळून आला आहे. बिळूर (ता. जत) येथे दोन, मणदूर (ता. शिराळा) येथे तीन, तर आमणापूर, नेलकरंजीत प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या 519 झाली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

दरम्यान, मिरजेतील कोरोना रुग्णालयात परराज्य आणि जिल्ह्यातील रुग्णांनाही दाखल केले जात आहे. आज नव्याने दोन रुग्ण दाखल करण्यात आले. त्यात इचलकरंजी आणि कबनूर (कोल्हापूर) येथील दोघांचा समावेश आहे.

नऊ चिंताजनक
सांगलीतील 78 वर्षीय महिला, बिळूर (ता. जत), बुधगाव (ता. मिरज) येथील 75 वर्षीय पुरुष, कानकात्रेवाडी (ता. आटपाडी) येथील 48 वर्षीय पुरुष, नेलकरंजी (आटपाडी) येथील 55 वर्षीय पुरुष, सांगली शहरातील 65 वर्षीय पुरुष, शिरोळ (कोल्हापूर), अथणी (बेळगाव), ब्रह्मनाळ (पलूस) येथील 40 वर्षीय पुरुष अशा एकूण नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

तालुकानिहाय रुग्ण
आटपाडी (53), जत (74), कडेगाव (27), कवठेमहांकाळ (15), खानापूर (27), मिरज (21), पलूस (38), शिराळा (132), तासगाव (25), वाळवा (58), महापालिका क्षेत्र (50).

 

जिल्ह्याची स्थिती
 सोमवारी आढळलेले रुग्ण ः 15
 जिल्ह्यातील एकूण रुग्ण ः 519
 उपचार घेणारे रुग्ण ः 229
 बरे झालेले रुग्ण ः 277
 आजवर मृत्यू झालेले ः 13
 पॉझिटिव्ह; पण चिंताजनक ः 9
 ग्रामीणमधील बाधित ः 408
 शहरी भागातील बाधित ः 61
 महापालिका क्षेत्र ः 50
...........


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As the number of patients increased, the danger to Miraj taluka increased