जिल्ह्यात पर्जन्यमापक केंद्रांची संख्या वाढली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

सांगली-राज्य सरकारने बाराही महिने पाऊस मोजमाप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. याबरोबरच जिल्ह्यात नेमक्‍या पावसाच्या मोजमापासाठी मंडल ठिकाणांच्या 60 गावांशिवाय नव्याने आठ ठिकाणी मोजमाप केले जाणार आहे. यात मिरज तालुक्‍यातील 5, जत, वाळवा आणि तासगाव तालुक्‍यातील प्रत्येकी एका गावचा समावेश आहे. महसूल मंडलातील पावसाचे नेमक्‍या मोजमापासाठी यापूर्वीच्या 60 मंडलातील दहा ठिकाणे बदलण्याची तयारी कृषी विभागाने सुरू केलेली आहे. 

पावसाचे नेमके मोजमाप करण्यासाठी मिरज तालुक्‍यातील भोसे, कवठेपिरान, कुपवाड, बेडग आणि बेळंकी वाळवा तालुक्‍यातील कुरळप, जत तालुक्‍यातील तिकोंडी तसेच तासगाव तालुक्‍यातील वायफळे येथे नव्याने 8 पर्जन्यमापक यंत्र सुरू करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने ही मंडले मोठी झाल्याने यंदापासून त्याच मंडलात लांब असलेल्या गावांच्या ठिकाणी पर्जन्यमापक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्ह्यात महसूल विभागाची 60 मंडले आहेत. त्यांची रचना सध्या फार जुन्या पद्धतीने आहे. आणि मंडलाचे ठिकाणी जरी एखाद्या टोकाला असले तरीही त्याच गावातील पाऊस मोजला जात होता. परिणामी मंडलाच्या गावापासून 10 ते 15 किलोमीटरवर असलेल्या गावात पाऊस जादा अथवा कमी पडत असल्याच्या वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. त्याचा परिणाम अतिवृष्टी, दुष्काळासह अन्य सवलती, जमिनीची आनेवारी जाहीर करताना होत असे. याच नेमक्‍या कारणावरून महसुलाचे गाव मध्यभागी नसेल अशा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र आता त्या परिसराच्या मध्यभागी ठेवण्याचा विचार आहे. त्यासाठी प्रस्तावही मागण्यात आले होते. असे जिल्ह्यातून 10 प्रस्ताव आल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. 
सरकारने नुकताच बाराही महिने पाऊस मोजण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 1960 ते 2010 या काळातील तालुक्‍याच्या पावसाची सरासरीही काढण्यात आली असून ती प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यापूर्वी केवळ पावसाळ्यात चार महिन्यांत पावसाची मोजदाद होत असे. 

"" सरकारने पाऊस मोजण्यातील त्रुटी दूर करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मंडलाची गावे बदलू शकत नसलो तरी त्या परिसराच्या मध्यभागी, गावात पर्जन्यमापक ठेवता येईल, असा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात नव्याने 8 ठिकाणांसह 10 मंडलातील पाऊस मोजमापे अन्य गावात स्थलांतरीत केली जातील.' 
-बसवराज मास्तोळी, अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of rain gauge stations increased in the district