esakal | रोपवाटिकेला अनुदान मिळावे ; आमदार पडळकरांची मागणी  

बोलून बातमी शोधा

nursery should get a grant Demand of MLA Padalkar}

ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केले

रोपवाटिकेला अनुदान मिळावे ; आमदार पडळकरांची मागणी  
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

झरे - आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल अधिवेशनामध्ये रोपवाटिका मालकांना अनुदान मिळावे असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामध्ये  म्हणाले तरुणांनी लाखो रुपये खर्च करून रोपवाटिका सुरू केले आहेत. परंतु त्यांना शासनाने अनुदान दिले नाही. त्यामुळे रोपवाटिकांचे मालक अडचणीत आहेत. त्यांना अनुदान त्वरित द्यावे असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. 

ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केले. त्यापैकी नर्सरी वाल्यांना अनुदान मिळावें हाही प्रश्न उपस्थित केला.
 नर्सरी वाल्यांना अनुदान मिळावे असे सर्वच शेतकऱ्यांना वाटत आहे. कारण नर्सरी वाल्यांनी लाखो रुपये खर्च करून नर्सरी उभा केली आहे. त्यामध्ये त्यांचे भांडवल गुंतले आहे. त्यामुळे त्यांना अनुदान मिळालेच पाहिजे या भूमिकेशी सर्व शेतकरी आहेत. 

परंतु त्याच बरोबर फळबाग लागवड झाली पाहिजे म्हणून शासन वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांपुढे घेऊन येत आहे. अनेक शेतकरी फळबाग लागवड करीत आहेत. मागील काही वर्षापूर्वी आटपाडी तालुक्यांमध्ये डाळिंब बागेची लागवड जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात झाली होती. परंतु रोगाने अनेकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळे डाळिंबाचे प्रमाण तालुक्यांमध्ये कमी झाले आहे. 

सध्या आंबा लागवड जास्त प्रमाणात होऊ लागली आहे. अर्जुन वाडी येथील अजित खरात व अन्य दहा शेतकऱ्यांनी आंबा लागवड केली आहे. परंतु, आंब्याची रोपे बोगस, रोगी, अशक्त, वेगळ्या वणाची रोपे रोपवाटिका मालकाने शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मग अशा नर्सरी वर  कारवाई पण व्हायलाच पाहिजे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

अर्जुनवाडीतील अजित खरात यांनी 800 रोपाची लागण केली असून ही सर्व रोपे शैलेश नर्सरी मलकापूर येथून आणली आहेत. त्यामध्ये गुच्छ रोग वेगळ्या वानाची व रोगी रोपे नर्सरी वाल्यांनी दिली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी  जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीचे निरसन करण्यासाठी शेती तज्ञ, शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी देऊन पाहणी केली. तर त्यामध्ये गुच्छरोग, वेगळ्या वाणाची रोपे आढळून आली आहेत.

नर्सरी मालकांना अनुदान  मिळालेच पाहिजे. परंतु, नर्सरी मालक अशी जर शेतकऱ्यांची फसवणूक करत असतील तर त्यांच्यावर कारवाई पण झालीच पाहिजे. अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. त्यांना अनुदान मिळू नये या भूमिकेशी कोणीही नाही.

नर्सरी धारकांना अनुदान मिळाले पाहिजे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला त्याच पद्धतीने ज्या रोपवाटिका बोगस रोपांचे वाटप करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी करावी अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.


 रोपवाटिकांना अनुदान मिळाले पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. परंतु ज्या रोपवाटिका बोगस रोपे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. 
- अजित खरात, शेतकरी


 प्रत्यक्ष आंबा प्लॉटची पाहणी केली असता  800 रोपांची लागण केली असून त्यामध्ये इतर जातीची 87 कलमे, एक वर्षापेक्षा जास्त 36 कलमे,  पर्नगुच्छ, गुच्छ रोग असणारी 63 कलमे आढळून आली. तसा जबाब नोंदवून पुढील कारवाईसाठी दाखल केला आहे. 
-पोपट पाटील, तालुका कृषी अधिकारी आटपाडी

संपादन - धनाजी सुर्वे