आटपाडी तालुक्‍यात पीक कर्जाला यांच्याकडून खोडा...वाचा 

नागेश गायकवाड 
Sunday, 12 July 2020

आटपाडी (सांगली)- दुष्काळाचा कलंक लागलेल्या आटपाडी तालुक्‍यात टेंभूचे पाणी आलं. त्यामुळे अनेक तरुण आधुनिक शेतीकडे वळू लागलेत, मात्र आटपाडी तालुक्‍यात शेती विकासाला विकास सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीयकृत बॅंकांनी पीक कर्जाचा पुरवठा थांबवून खोडा घातला आहे. सचिव आणि बॅंकेचे अधिकारी पिक कर्ज वाटपात राजकारण करत आहेत. त्यामुळे हजारो तरूण शेतात फळबागा आणि पिके असूनही कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. 

तालुक्‍याला पाच वर्षांपूर्वी टेंभूचे पाणी आले. अनेक भागात आणि तलावात जावू लागले. बंदिस्त पाईपलाईनची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे तरुण पिढी आधुनिक शेतीकडे वळू लागली आहे. पडीक असलेली शेत जमीन विकसित केली आहे. डाळिंब, द्राक्ष बागा उभा केल्या. भाजीपाला क्षेत्र वाढत आहे. शेती विकासाची गाडी गती घेऊ लागली आहे, पण त्याला आर्थिक पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांनी खोडा घातला आहे. तालुक्‍यात 60 गावात 90 विकास सोसायटी आहेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या 18 आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या सात शाखा आहेत. सहकारी बॅंका सोसायटीच्या माध्यमातून अल्प व्याजदरात पीक कर्जाचा पुरवठा करतात. प्रत्यक्षात तालुक्‍यात पिक कर्ज पुरवठ्यात वेगळे चित्र आहे. 

शेतकऱ्याची पीक पाणी नोंद करण्यापासून ते विकास सोसायटी, बॅंक अधिकारी प्रचंड अडवणूक आणि पिळवणूक करीत आहेत. सोसायटीमधून यापूर्वी राजकारण्यांना शेतात पिके, बागा नसतानाही क्षमतेपेक्षा जास्त पीक कर्ज पुरवठा केला आहे. तर शेतीकडे वळलेल्या तरुणांना बागा असतानाही कर्ज देण्यात डावलले जात आहे. सोसायटी एक वर्ष कमाल मर्यादा नोंदवत नाहीत. सचिवाकडून एकदम 50 शेतकऱ्यांची सांगलीतून नोंद करून आणू असे सांगून टाळले जात आहे. प्रत्यक्षात नोंदणी आटपाडी होते. 
अनेक गावातील हजारो कमाल मर्यादा नोंदणी सहा महिन्यापासून विविध कारणे सांगून प्रलंबित ठेवली आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करणारी सोसायटी ते बॅंकापर्यंतची व्यवस्था पडली आहे. याचा परिणाम तालुक्‍याच्या शेती विकासावर होणार आहे. 

""पीक कर्जासाठी आवश्‍यक असलेली कमाल मर्यादा नोंदणी थांबवता येत नाही. तक्रारीनंतर सचिवांना नोंदणी कामे करण्याचे आदेश दिलेत. सचिवांनी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास कारवाई केली जाईल.'' 
- बी.डी.मोहीते, (सहाय्यक निबंधक, आटपाडी) 

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obstruction from crop loan sanction in Atpadi taluka