काही दिवसांपूर्वी मौजे डिग्रज येथेही दोन लहान मुलांना मध्यरात्री आणून पूजा केल्याचा प्रकार घडला होता. त्या वेळी नरबळीची अफवा पसरली होती. त्यानंतर कसबे डिग्रज स्मशानभूमीतील अघोरी पूजेचा प्रकार समोर आला. या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तुंग : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील स्मशानभूमीमध्ये काही दिवसांपूर्वी मध्यरात्री जादूटोण्यासह अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला. बुधवार व गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार स्मशानभूमीमध्ये केला असल्याची चर्चा आहे.