सांगलीत कृषी सप्ताहात 175 गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी 

विष्णू मोहिते
Friday, 10 July 2020

सांगली,  ः जिल्ह्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यातील कृषी विभाग आणि विद्यापिठे येथील अधिकारी आणि शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जावून संवाद साधण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात 175 गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करण्यात आले. 

मिरज तालुक्‍यातील बेडग गावात कृषी सप्ताहाला सुरुवात झाली. पायाप्पाचीवाडी येथे एम. आर. ई. जी. एस अंतर्गत बांधावर फळबाग लागवडीचा आंबा वृक्ष लागवड करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे प्रमुख पाहुणे तर जितेश कदम उपस्थित होते. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी श्री. कठमाळे, कृषि उपसंचालक सुरेश मगदूम, उपविभागीय कृषि अधिकारी हणमंत इंगवले, आत्माचे प्रकल्प उपसंचालक प्रभाकर पाटील, कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार उपस्थित होते. 

कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री. कठमाळे, शास्त्रज्ञ डॉ. मनोज माळी, डॉ. रत्नकुमार दिक्षित, डॉ. राठोड, डॉ. महाजन, जाधव, डॉ. भाकरे यांनी शास्वत शेती, पिक उत्पादनावर परिणाम न करता पिक उत्पादन खर्च कमी करणे, सुधारित जातीचा अवलंब, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण, फळबाग लागवड, आंबा व पेरू घन लागवड याबाबत विद्यापीठाच्या शिफारसीसह सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध शंकांचे निरसन केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers on the bunds of farmers in 175 villages during Sangli Agriculture Week