जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचे भाग्य उजळणार

The old building of the Zilla Parishad will be restored to glory
The old building of the Zilla Parishad will be restored to glory
Updated on

 नगर : जिल्हा परिषदेची नवी इमारत उभी राहिल्यानंतर जुन्या इमारतीकडे दुर्लक्षच झाले. त्यात जुन्या वस्तू, भंगार टाकल्याने ती अडगळीची इमारत झाली. त्यामुळे शहराचे वैभव असलेल्या या इमारतीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. मात्र, आता या इमारतीचे भाग्य उजळणार आहे. 

या जुन्या इमारतीमध्ये लोकल बोर्डापासून कारभार सुरू होता. कालांतराने इमारत कमी पडू लागल्याने नवीन इमारत बांधली. त्यानंतर या इमारतीतील पदाधिकाऱ्यांच्या दालनांसह मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य कारभार नवीन इमारतीत स्थलांतरित झाला. तेथे अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांच्या दालनांत नवीन साहित्य आल्याने, जुने साहित्य नेमके कोठे ठेवायचे, असा प्रश्‍न उभा राहिला. मग त्यातील काही साहित्य जुन्या इमारतीमध्ये आले. त्यानंतर वर्षानुवर्षे जिल्हा परिषदेमध्ये नवे साहित्य येत गेले आणि जुन्या इमारतीतही साहित्याची भर पडत गेली. या जुन्या साहित्यामुळे सुस्थितीत असलेल्या इमारतीची रया गेली. 

अडगळीचे साहित्य हटणार

जुन्या इमारतीतील साहित्य हटविण्यात यावे, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा प्रशासनाला सांगितले; परंतु त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारातील सर्व कार्यालयांना भेट दिली. त्या वेळी या इमारतीची स्थिती त्यांच्या लक्षात आली. ही इमारत वापरात येऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेकडून माहिती घेऊन तशा सूचना संबंधितांना दिल्या. त्यानुसार या इमारतीतील अडगळीचे साहित्य हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या.

प्रशासनाचे नियाेजन सुरु

 इमारतीतील नेमकी कोणत्या भागात दुरुस्ती करायची? कोणता भाग वापरात येऊ शकतो, याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू झाल्याने, या इमारतीचे भाग्य उजळणार आहे. या इमारतीमध्ये स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी आठवड्यातील एक दिवस थांबून कामकाज पाहणार आहेत. 

माध्यमिक विभाग येण्याची शक्यता?

गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त वातावरणात माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार जुन्या पंचायत समितीच्या इमारतीत सुरू आहे. त्यांचा कारभार आता जुन्या इमारतीत येण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास त्यांची नरकयातनेतून सुटका होईल. 

अडगळीतील साहित्याचे निर्लेखन हाेणार 
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या इमारतीची पाहणी केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार इमारतीतील साहित्याचे निर्लेखन करण्यात येणार आहे, तसेच इमारतीची डागडुजी केली जाईल. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Kavthemahankal youth missing canal accident
Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
Marathi News Esakal
www.esakal.com