कऱ्हाड दक्षिण युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी पुन्हा वैभव थोरात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

रेठरे बुद्रुक : कार्वे येथील माजी सरपंच वैभव थोरात यांची कऱ्हाड दक्षिण युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड निवड करण्यात आली आहे. 

रेठरे बुद्रुक : कार्वे येथील माजी सरपंच वैभव थोरात यांची कऱ्हाड दक्षिण युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड निवड करण्यात आली आहे. 
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रेठरे बुद्रुक येथील मेळाव्यात वैभव थोरात यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे, भोरचे आमदार संग्राम थोपटे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
याबाबद्दल त्यांचे कृष्णाचे माजी संचालक माणिकराव जाधव, प्रदेश युवकचे सचिव नितीन पाटील, दक्षिणचे सचिव सूरज जगताप, अभिजित चव्हाण, सुधीर चव्हाण, नंदू कारभारी, कार्वेचे माजी उपसरपंच संभाजीराव थोरात, माणिकराव थोरात, शब्बीर मुजावर, निखिल जाधव आदींनी अभिनंदन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: once again Vaibhav thorat becomes karad south youth congress president