इस्लामपुरात एकाच दिवसात काढल्या दीडशे तक्रारी निकाली 

धर्मवीर पाटील
Monday, 12 October 2020

उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या पुढाकाराने इस्लामपूर उपविभागात येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अभिलेखावरील प्रलंबित असलेल्या सुमारे दीडशे तक्रारी निकाली काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

इस्लामपूर : उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या पुढाकाराने इस्लामपूर उपविभागात येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अभिलेखावरील प्रलंबित असलेल्या सुमारे दीडशे तक्रारी निकाली काढण्यात पोलिसांना यश आले आहे. एकाच दिवशी इतक्‍या मोठ्या प्रमाणात तक्रारीची निर्गती करण्याचे काम पोलिसांनी करून दाखवले आहे. श्री. पिंगळे यांनी शनिवारी (ता. 10) या विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. 

पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करुन जास्तीत जास्त तक्रार अर्ज निर्गत करणे, प्रशासन अधिकधिक लोकभिमुख बनविणे, जनतेच्या तक्रारीची दखल घेणे, त्यांचे वेळेत निरसन करणे, तक्रारदारांना सन्मानाची वागणुक देणे, खोटया, दिशाभूल करणाऱ्या अनेक तक्रारीची शहानिशा करणे, भविष्यात गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, तक्रारीचे वेळीच निरसन करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, हे अत्यंत महत्वाचे कार्य पार पाडले जाते. 

तक्रार निवारण दिन विशेष कार्यशाळेचे अनुषंगाने उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्यासह इस्लामपूर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी समक्ष तक्रारदारांच्या तक्रारीचे स्वरुप लक्षात घेवून तात्काळ कारवाई करण्यावर भर दिला. यातून उपविभागातील 150 तक्रार अर्जाची निर्गती करण्यात आली. या तक्रार निवारण दिन कार्यशाळेस अर्जदार व गैरअर्जदार असे एकूण 300 ते 350 लोक हजर होते. 

पोलीस ठाणे निहाय निर्गत तक्रारींची संख्या 
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय - 8, 
इस्लामपूर पोलीस ठाणे - 55, 
आष्टा पोलीस ठाणे - 50, 
कुरळप पोलीस ठाणे - 9, 
कासेगांव पोलीस ठाणेकडील - 4, 
शिराळा पोलीस ठाणे - 18, 
कोकरुड पोलीस ठाणे - 6.

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half hundred complaints were settled