दरोडा-घरफोडीतील एक जेरबंद; सहा गुन्हे उघडकीस

One arrested in robbery-burglary; Six crimes uncovered
One arrested in robbery-burglary; Six crimes uncovered
Updated on

सांगली ः दरोडा, घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गजाआड केले. देवगण ऊर्फ देव्या बापू पवार (वय 19, रा. सरकारी दवाखान्यामागे, आटपाडी, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 2 लाख 89 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडून आटपाडीतील सहा गुन्हे उघडकीस आले असून चार गुन्हे पाहिजे असलेला आरोपी आहे. 

अधिक माहिती अशी, की दरोडा, घरफोडीसह चोरीतील गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकातील पोलिस गस्तीवर होते. त्यावेळी आटपाडी येथील दुर्गाप्रसाद हॉटेलजवळ एकजण चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याचे समजले. त्यानुसार सापळा रचून देवगण पवार यास ताब्यात घेण्यात आले आहे.

सखोल चौकशी केली असता राजेवाडी (ता. आटपाडी) येथील अदिती ज्वेलर्स दुकान, आटपाडी शहरात घरफोडी, तळेवाडीतील चोरी, दिघंची येथील घरफोडी, आटपाडी शहरातील घरफोडी केल्याचे समोर आले.

तसेच देवगण व त्याच्या सात साथीदारांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशीरस पोलिस ठाण्याच्या हद्दीत 19 जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास पिलीव घाटात एसटी बस लुटण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले. तसेच दरोड्याचा गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी चोरल्याचेही समोर आले. चार गुन्ह्यात तो पाहिजे असलेला संशयित आरोपी होता. पुढील तपास आटपाडी पोलिस करत आहेत. 

कारवाईत उपनिरीक्षक दिलीप डेरे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, संदीप गुरव, संदीप नलावडे, मच्छिद्र बर्डे, राजू शिरोळकर, सोहेल कार्तियानी, संतोष गळवे, आमसिद्धा खोत यांचा सहभाग होता. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com