गावठी पिस्तुल विक्रीसाठी आला, अन...

One arrested while saling pistols at islampur
One arrested while saling pistols at islampur

इस्लामपू (जि. सांगली) : इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर निनाईनगर परिसरात गावठी बनावटीचे पिस्तुल व काडतुसे विक्री करण्याकरता आलेल्या बाबा ऊर्फ बाबू शंकर घोरपडे (वय 25, रा. लासुर्णे, जि. पुणे) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण सांगलीच्या पथकाने ताब्यात घेतले. 

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून आलेल्या सूचनेनुसार श्रीकांत पिंगळे यांनी खास पथक तयार केले आहे. त्या माध्यमातून माहिती काढण्याचे काम सुरू असताना आज एकला ताब्यात घेतले. एक संशयित निनाईनगर येथे कमरेला गावठी पिस्तुल लावून विक्री करीत फिरत आहे, असे आज पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. तो रंगाने काळा असून मळकट पांढरा शर्ट, राखाडी पॅन्ट, पायात चप्पल घातले आहे.

त्यावर ताबडतोब पोलिसांनी सापळा रचून सोबत पंच घेऊन त्या ठिकाणी दाखल झाले. माहिती मिळालेल्या वर्णनाचा संशयित पोलिसांना त्या जागेवर सापडला. त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ कमरेला गावठी बनावटीचे 50 हजार रुपये किमतीचे पिस्तुल, 800 रुपयेची 4 काडतुसे सापडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतची फिर्याद पोलीस नाईक सागर विठ्ठल लवटे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

श्री. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, हवालदार बिरोबा नरळे, निलेश कदम, शंकर पाटील, संदीप गुरव, संदीप पाटील, सचिन धोत्रे, संतोष गळवे, अनिल कोळेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com