सोलापूरात महिन्यातील एक दिवस प्लास्टिक मुक्त!

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

सोलापूर : स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात महिन्यातील एक दिवस 
प्लास्टिकमुक्त दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. त्याची सुरवात उद्यापासून (बुधवार) होणार आहे. या संदर्भातील आदेश नगर विकास विभागाने सर्व महापालिकांना पाठवले आहेत अशी माहिती अन्न व परवाना अधीक्षक श्रीराम कुलकर्णी यांनी ' सकाळ'ला दिली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे ओचित्य साधून 2 ऑक्‍टोबर 2014 पासून देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्यास पाच वर्षे होत आहेत. या अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी स्वच्छता ही सेवा हे अभियान राज्यात राबविण्यात येणार आहे. त्या अभियानात राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था 11 सप्टेंबर ते 27 ऑक्‍टोबर2019 या कालावधीत सहभागी होणार आहेत. 

या मोहिमेत सर्व शासकीय कार्यालये, बिगर सरकारी संस्था, रहिवाशी संघटना, व्यापारी संघटना यांना सहभागी करून घेऊन संपूर्ण शहर प्लास्टिकमुक्त करण्यात येणार आहे. गोळा केलेले प्लास्टिकची वर्गवारी करून स्थानिक स्वराज्य संस्थेकडून रिकव्हरी फॅसिलीटी केंद्रावर साठा केला जाणार आहे. पुर्नचक्रीकरण न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर रस्त्यांसाठी केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही अशा प्लास्टिकचा वापर रस्ते बांधणी करण्यासाठी वापरावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

मोहिमेसंदर्भातील काही प्रमुख कलमे 
- महापालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापन प्रणालीची उभारणी 
- कापडी पिशव्यांच्या वापरासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे 
- घरपोच सेवा देणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट साखळ्यांना प्लास्टिक भांडी वापरापासून परावृत्त करणे 
- प्लास्टिक मुक्ती मोहिमेसंदर्भात जनजागृतीसाठी धर्मगुरू, वक्‍त्यांची मदत घेणे 
- प्लास्टिकमुक्त रहिवाशी संघटनांचा सन्मान करणे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one day in month is plastic free day in solapur