पुणे-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र.आर.जे. 22 जी.बी. 5005) टँकरला (क्र एम एच 10 ए 4146) जोराची धडक दिली. त्यात टँकरमधील चालक रमेश जगताप यांचे डोके स्टेरींगवर आपटले व डोक्याला जबर मार लागला. धडक बसलेला टॅंकर ट्रकबरोबर अडकून 50 फुटा पर्यंत फरफटत गेला.

नेर्ले (ता. वाळवा) - येथील राष्ट्रीय महामार्गावर झाडांना पाणी देणाऱ्या टँकरला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिल्याने टँकरमधील चालकाचा मृत्यू झाला. रमेश मधुकर जगताप (वय 55 ) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. ही धडक एवढी भीषण होती की टँकरमध्ये ट्रक अडकून तो 50 फूट फडफडत गेला. यात  सुदैवाने  झाडांना पाणी घालणारे कर्मचारी दीपक हरी पवार थोडक्यात बचावले.

हे पण वाचा - एसटीत मुलींची छेड काढणे चांगलेच पडले महागात 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नेर्लेहून कराडकडे जाणाऱ्या महामार्गावरील दुभाजकांवर लावलेल्या झाडांना नेहमीप्रमाणे पाणी घालण्याचे काम सुरू होते. यावेळी दीपक पवार हे झाडांना पाणी घालत महामार्गावरून उजव्या बाजूने जात होते. पाणी देणारा टँकर हळूहळू पुढे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र.आर.जे. 22 जी.बी. 5005) टँकरला (क्र एम एच 10 ए 4146) जोराची धडक दिली. त्यात टँकरमधील चालक रमेश जगताप यांचे डोके स्टेरींगवर आपटले व डोक्याला जबर मार लागला. धडक बसलेला टॅंकर ट्रकबरोबर अडकून 50 फुटा पर्यंत फरफटत गेला. यावेळी ग्रामस्थ व पोलिसांनी रमेश जगताप यांना कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु उपचार सुरू असतानाच रमेश जगताप यांचा मृत्यू झाला. ट्रक चालक उमेर पणेसिह (वय 34 रा. गडा, ता. शेरगड, जि. जोधपूर, राजस्थान) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दीपक पवार यांनी कासेगाव पोलिस ठाण्यात अपघाताची फिर्याद दिली आहे. हवालदार डी. जे. मंडले तपास करीत आहेत. रमेश जगताप येवलेवाडी गावचे उपसरपंच अरविंद जगताप यांचे मोठे भाऊ होते. 

चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे
महामार्गावर जीव धोक्यात घालून पाणी मारण्याचे काम सुरू असते. यावेळी महामार्गावरील वाहन चालकांनी  वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी महामार्ग प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead in accident on pune banglor highway