
सांगली : म्हैसाळच्या कालव्यात एकजणाचा बुडून मृत्यू
कवठेमहांकाळ - कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील म्हैसाळ योजनेच्या कालव्यात एक जण बुडून मृत्यू झाला. लक्ष्मण आनंदा कदम (वय ५२) रा. नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. शुक्रवार रात्री दहाच्या दरम्यान उघडीस आली याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे.
याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी की, लक्ष्मण आनंदा कदम याला दारूचे व्यसन होते. त्याची पत्नी व मुलासह माहेरी राहते. हा गेले चार दिवस झाले बेपत्ता होता. नातेवाइकांनी सर्वत्र याची शोधाशोध केली. परंतु तो काही दिसून आला नाही. अखेर त्याचा मृतदेह कुची हद्दीत म्हैसाळ कालव्यात एका पाईपला अडकलेल्या स्थितीत दिसून आला. चार दिवसापूर्वी पाण्यात पडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मृतदेह सडलेल्या स्थितीत सापडला जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला.याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे.