तासगावमध्ये व्यापारांचा चौथ्या दिवशी शंभर टक्के बंद 

रविंद्र माने 
Thursday, 3 September 2020

तासगाव शहर व्यापारी वर्गाने कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 30 औगस्ट ते 6 सप्टेंबर अखेर व्यापार बंद चे आवाहन केले आहे.

तासगाव : तासगाव शहर व्यापारी वर्गाने कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 30 औगस्ट ते 6 सप्टेंबर अखेर व्यापार बंद चे आवाहन केले आहे त्याला आज चौथ्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद लाभला. मेडिकल स्टोअर्स, शेती औषध दुकानही दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी रहात आहेत. नागरिकांमधून मात्र बंदला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. 

तासगाव शहरात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव आणि वाढती बळींची संख्या रोखण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ना नेता ना आदेश तोच प्रशासनाचा पोलिसांचा पाठींबा नाही अशा अभूतपूर्व बंदचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे सर्व व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवत याला दिलेला प्रतिसादही तितकाच उत्स्फूर्त आहे. विशेष म्हणजे पान पट्टी, चहा टपऱ्यांसह सर्व व्यावसायिक या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. अत्यावश्‍यक सेवा असूनही मेडिकल स्टोअर्स दुपारी दोन पर्यंत उघडी ठेवण्यात येत आहेत. पहिल्या तीन दिवसानंतर शेती औषध दुकाने आज दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू करण्यात आली आहेत. किराणा माल दुकानही बंद आहेत. 

तासगावात कोरोनामुळे आतापर्यंत 25 बळी गेले आहेत, कोरोना रुगणांची संख्या ही आता झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी बंद केला मात्र नागरीकांमधून आवश्‍यक ती काळजी घेतली जाताना दिसत नाही. विना मास्क फिरणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे जेष्ठ नागरिकांची रस्त्यावर दिसणारी संख्या चिंता वाढविणारी आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred percent closure of trade in Tasgaon on the fourth day