
कडेगाव : कोतिज (ता. कडेगाव) येथे पुसेसावळी-विटा रस्त्यावर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यामध्ये दुचाकी चालक कृष्णत पोपट सूर्यवंशी (वय ४३, खेराडे वांगी) यांचा मृत्यू झाला, तर बाबूराव मारुती जाधव (६५, खेराडे वांगी) गंभीर जखमी झाले. या प्रकरणी ट्रकचालक योगेश राजेंद्र मानकर (तासगाव) याच्याविरुद्ध कडेगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना शनिवारी (ता.१७) रात्री ९ वाजता घडली. याबाबत तेजस किसन कदम (खेराडे वांगी) यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली.