झाडांना पाणी घालणाऱ्या टॅकरला घडक; एक जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

सोलापुर- पुणे या महामार्गावर अरण (ता. माढा) येथे रविवारी सकाळी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडांना टॅकरच्याद्वारे चालक मनोहर लक्ष्मण ढेरे व कामगार विलास ताकतोडे हे पाणी घालत होते. यावेळी मुबंईवरून हैद्राबादच्या दिशेने मालवाहतूक करणारा ट्रॅकने (एमएच ०४ जीआर ५१८७) रस्त्यावर उभ्या असलेल्या पाण्याच्या टॅकरला जोरदार धडक दिली.

उपळाई बुद्रूक (सोलापुर) : सोलापुर- पुणे महामार्गावर माढा तालुक्यातील अरण परिसरात झाडांना पाणी घालणाऱ्या टॅकरला ट्रकने जोराची धडक दिली. या झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १२)  सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी घडली.
मिळालेली माहिती नुसार सोलापुर- पुणे या महामार्गावर अरण (ता. माढा) येथे रविवारी सकाळी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडांना टॅकरच्याद्वारे चालक मनोहर लक्ष्मण ढेरे व कामगार विलास ताकतोडे हे पाणी घालत होते. यावेळी मुबंईवरून हैद्राबादच्या दिशेने मालवाहतूक करणारा ट्रॅकने (एमएच ०४ जीआर ५१८७) रस्त्यावर उभ्या असलेल्या पाण्याच्या टॅकरला जोरदार धडक दिली. यात ट्रॅकमधील चालक सहायक बसकल्याण (बिदर) येथील अंनतराज तिपन्ना हे जागीच ठार झाले. तर चालक उमेश तिपन्ना (रा. बसकल्याण, बिदर) हे गंभीररित्या जखमी झाले. तर पाणी घालणारे ढेरे व ताकतोडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी तातडीने महामार्ग पोलिसांनी भेट देत जखमींना उपचारासाठी दाखल केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one killed in solapur pune highway accident