एक लाख 22 हजार कुटुंबाची आरोग्य तपासणी होणार : महापौर गीता सुतार...माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानास प्रारंभ 

बलराज पवार
Wednesday, 16 September 2020

सांगली-  स्वत:च्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानास सहकार्य करा. या मोहिमेत महापालिकेच्या पथकासोबत नगरसेवकांनीही सहभागी होऊन नागरिकांच्या आरोग्याच्या सर्व्हेसाठी आवाहन करावे असे आवाहन महापौर गीताताई सुतार यांनी केले. 

सांगली-  स्वत:च्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानास सहकार्य करा. या मोहिमेत महापालिकेच्या पथकासोबत नगरसेवकांनीही सहभागी होऊन नागरिकांच्या आरोग्याच्या सर्व्हेसाठी आवाहन करावे असे आवाहन महापौर गीताताई सुतार यांनी केले. 

शासनाने जाहीर झालेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान महापालिका क्षेत्रात आजपासून राबवण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ महापौर सौ गीता सुतार यांच्या उपस्थितीत शिंदेमळा येथून झाला. या अभियानातंर्गत महापालिका क्षेत्रातील एक लाख 22 हजार कुटुंबाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त स्मृती पाटील आणि वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. चारुदत्त शहा यांच्यामार्फत 245 पथकाची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून दररोज 50 कुटुंबाची आरोग्य माहिती घेऊन ती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. 

आयुक्त नितीन कापडणीस यांनी, महापालिकेच्या पथकाला नागरिकांनी कुटुंबातील सदस्यांची आरोग्यविषयक माहिती द्यावी. असे आवाहन केले. या मोहिमेमुळे कोरोना सदृश्‍य कोणाला लक्षणे असतील तर अशा व्यक्ती शोधणे सोपे जाणार आहे. त्यामुळे सर्वानी तपासणी करून घ्यावी असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी यावेळी केले. 
यावेळी प्रभाग एकच्या सभापती उर्मिला बेलवलकर, महिला बालकल्याण सभापती नसीमा नाईक, डॉ चारुद्धत शहा, लेखापाल किरण आनंदे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका माधुरी पाटील, आशा समन्वयक ऋतुजा पाटील, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार, केंद्र समन्वयक रवी शिंदे आदी उपस्थित होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh 22 thousand families will undergo health check-up : Mayor Geeta Sutar