पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे नेतृत्त्वातील तपास पथकास एक लाखाचे बक्षीस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - संशयित सलीम मुल्ला टोळीवरील मोका अंतर्गत गुन्ह्याचा तपासात तब्बल 44 संशयितांवर ठोस पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल करण्याचे उल्लेखनीय काम शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी केले. मटका व्यवसायाचे कोल्हापूर, सांगली, मुंबईसह गुजरात कनेक्‍शन उघड करून गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या. या कामाबद्दल कट्टे यांचा खुद्द पोलिस महासंचालकांकडून गौरव करण्यात आला. या तपासाबद्दल पथकाला त्यांच्याकडून एक लाख रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

कोल्हापूर - संशयित सलीम मुल्ला टोळीवरील मोका अंतर्गत गुन्ह्याचा तपासात तब्बल 44 संशयितांवर ठोस पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल करण्याचे उल्लेखनीय काम शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी केले. मटका व्यवसायाचे कोल्हापूर, सांगली, मुंबईसह गुजरात कनेक्‍शन उघड करून गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या. या कामाबद्दल कट्टे यांचा खुद्द पोलिस महासंचालकांकडून गौरव करण्यात आला. या तपासाबद्दल पथकाला त्यांच्याकडून एक लाख रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. अवैध धंदेवाल्यांवर केलेल्या कारवाईबद्दलचे उल्लेखनीय तपासाबाबत एका महिला पोलिस अधिकाऱ्यांना मिळालेले हे जिल्ह्यातील पहिलेच बक्षीस ठरले. 

यादवनगरातील मटका अड्डयावर सप्टेंबरमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर संशयित सलीम मुल्ला टोळीवर मोकाची कारवाई करण्यात आली. याचा तपास शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी दैनदिन कामाचा व्याप सांभाळत या गुन्ह्याचा खोलवर जाऊन तपास केला.

मुल्लाच्या मटक्‍याचे शहरासह जिल्ह्यातील कनेक्‍शन त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे पंटर, साथिदार अशांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करून त्यांच्यावर मोका अंतर्गत अटकेची कारवाई केली. यात सांगली, मुंबई, गुजरात येथील सावला गॅंगच्याही मोरक्‍याच्या मुसक्‍या त्यांनी आवळल्या. एक एक करत कट्टे यांनी 42 जणांना जेरबंद केले.

इतकेच नव्हे तर या गुन्ह्यातील संशयित सम्राट कोराणेवरही मोका अंतर्गत कारवाई करून दोषारोपत्र सादर केले. संशयितांना न्यायालयात हजर करणे, त्यांची पोलिस कोठडी घेणे, मोका कारवाईला संशयितांच्या दिलेल्या आव्हान याचिकेच्या सुनावण्याला हजर राहण्यासाठी त्यांना वारंवार पुणे मोका न्यायालयात वारंवार ये-जा करावी लागत होती. तरीही या कामातून वेळेत 44 संशयितांवर पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर करण्याचे उल्लेखनीय काम कट्टे यांनी केले. त्यांच्या या कार्याची दखल पोलिस दलाने घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh prize to Deputy Superintendent of Police Prerana Katte