esakal | ब्रेकिंग - इस्लामपुरातील आणखी एकाला कोरोनाची लागन
sakal

बोलून बातमी शोधा

one more corona positive in sangli

28 मार्च रोजी NIV कडून प्राप्त झालेल्या अहवालापैकी एका व्यक्तीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे  तर उर्वरित दोघांचे निगेटिव्ह आले आहेत.

ब्रेकिंग - इस्लामपुरातील आणखी एकाला कोरोनाची लागन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. इस्लामपूर येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे एकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 25 झाली आहे.

 28 मार्च रोजी NIV कडून प्राप्त झालेल्या अहवालापैकी एका व्यक्तीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे  तर उर्वरित दोघांचे निगेटिव्ह आले आहेत. ज्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, ती व्यक्ती मिरज येथील आयसोलेशन कक्षामध्ये असून इस्लामपूर येथील ज्या कुटुंबातील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्याशी संबंधितच ही व्यक्ती आहे, अशी माहिती जिल्हा अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

loading image
go to top