ऑनलाइन शाळा सुरु होणार, शिक्षक भरती कधी?

पदे रिक्त असून या शिक्षकांच्या विषयाचे धडे ऑनलाइन कोण घेणार ?
ऑनलाइन शाळा सुरु होणार, शिक्षक भरती कधी?

कामेरी : राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित, शाळाची घंटा मंगळवार (ता. १५) पासून ऑनलाइन (online education) वाजणार आहे. मात्र या शाळातील सुमारे ३१ मे अखेर ७ हजार शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. राज्यात जवळजवळ २३००० शिक्षकांची पदे रिक्त असून या शिक्षकांच्या विषयाचे धडे ऑनलाइन कोण घेणार ? हा प्रश्न शैक्षणिक संस्था चालकांसमोर उभा आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी भाजप सरकारच्या (bjp government) काळात पवित्र पोर्टल (pavitra portal) सुरू झाले. मात्र हे पवित्र पोर्टल सुरवातीपसूनच अडचणीचे ठरले. त्यामुळे शिक्षकांची भरती रखडली. मध्यंतरी फक्त ६००० जागा भरण्यात आल्या. उर्वरित सहा जागांसाठी अजूनही भरती झालेली नाही. त्यात ३१ मे अखेर सुमारे ७००० शिक्षक सेवानिवृत्त झाले. शिवाय पूर्वीच्या अशा सुमारे २३ हजार जागा रिक्त आहेत. इंग्रजी, सायन्स गणित या मुख्य विषयांच्या जागा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत. या विषयाला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. कोरोना काळातही फटका बसला.

ऑनलाइन शाळा सुरु होणार, शिक्षक भरती कधी?
तब्बल 55 किलोचा फणस; सासऱ्याकडून लाडक्या जावयांना भेट

आता २०२१-२२ या शैक्षणिक वर्ष मंगळवार १५ जूनपासून सूरु होत आहे. रिक्त जागा आरक्षणाच्या (reservation) मुद्द्यावर रखडल्या. याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. शैक्षणिक संस्थांत पारदर्शक नोकरभरती व्हावी या हेतूने भाजप सरकारच्या काळात पवित्र पोर्टल सुरू केले. यासाठी अभियोग्यता परीक्षाही घेण्यात आली. यात हजारो विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील काहींची वर्णी लागली तर अजूनही यातील जागा रिक्त आहेत. याचबरोबर आता नव्याने सुमारे २३ हजार जागा रिक्त असून या जागेसाठी पुन्हा अभियोग्यता होणार का? या जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरणार ही संस्थाचालकांच्या माध्यमातून भरणार याबाबत अजून ठोस निर्णय झालेला नाही.

शैक्षणिक वर्ष सुरू असल्याने या जागा भराण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. काही शैक्षणिक संस्थांनी आत्तापर्यंत रिक्त पदावर संस्था पातळीवर शिक्षकांच्या नेमणूका केल्या. मात्र या सेवकांचा पगार संस्थेला द्यावा लागत होता ते आता शक्य‌ नाही. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन या रिक्त जागा भराव्यात अशी मागणी शैक्षणिक संस्थाचालक व पालकांनी केली आहे.

ऑनलाइन शाळा सुरु होणार, शिक्षक भरती कधी?
उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री उद्या कोल्हापुरात; जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेणार

"शिक्षक भरती बाबत आपण शासनाकडे पाठपुरावा केला आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील पवित्र पोर्टलच्या जागा तात्काळ भरल्या जातील. उर्वरित रिक्त जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याचबरोबर वरिष्ठ महाविद्यालयाच्या जागेबाबत ही उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे. कोविडमुळे या गोष्टी प्रलंबित राहिल्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत."

- आमदार, जयंत आसगांवकर, पुणे शिक्षक मतदार संघ

"राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शाळेतील शिक्षकांच्या सुमारे २३ हजार च्या वर रिक्त जागा असून पवित्र पोर्टल भरतीतील रखटलेल्या जागा अगोदर भरा व आता नव्याने निर्माण झालेल्या सुमारे तेवीस हजाराच्या रिक्त जागा या अभियोग्यता चाचणी घेवून जागा तात्काळ भरून विद्यार्थ्यांना दिलासा द्या."

- संतोष मगर पाटील, राज्य अध्यक्ष (डी. टी. एड. बीएड स्टुडन्ट असोसिएशन)

ऑनलाइन शाळा सुरु होणार, शिक्षक भरती कधी?
आम्हीच तुमची वाट पाहतोय; संभाजीराजेंचे नक्षलवाद्यांना पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com