शाळा भरणार फक्‍त 120 दिवस ; सरकारचा विचारविनीमय सूरू 

मिलिंद देसाई
Sunday, 26 July 2020

कोरानाचे संकट लवकर दूर न झाल्यास शैक्षणिक वर्षावर मोठा परीणाम होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

बेळगाव : कोरानाच्या वाढत्या संसर्गामुळे ऑगस्ट महिन्यामध्येही शाळा बंदच राहणार आहेत. यावर शिक्‍कामोर्तब झाले असून कोरोनाचे संकट असेच कायम राहिल्यास फक्‍त 120 दिवस शाळा भरविण्याचा विचार शिक्षण खात्याने सुरु केला आहे. त्यामुळे कोरानाचे संकट लवकर दूर न झाल्यास शैक्षणिक वर्षावर मोठा परीणाम होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळांवर परीणाम झाला आहे. तसेच अनेक परीक्षा रद्द करीत विद्यार्थ्याना पास करण्याची वेळ शिक्षण खात्यावर आली तर दहावीची परीक्षा तीन महिन्यांच्या विलंबाने घेण्यात आली. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेवरही मोठा परीणाम झाला आहे. त्याचबरोबर शाळा कधीपासून सुरु होतील याबाबत आतापासून काही निश्‍चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे शिक्षण खात्याने शाळा सुरु करण्याबाबत वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु केला आहे. सुरुवातीला ऑगस्ट महिन्यात शाळा सुरु केल्या जातील, असे सांगण्यात आले होते. मात्र वाढती रुग्ण संख्या पाहून सप्टेंबरनंतर शाळा सुरु कराव्यात की 120 दिवस शाळा भरवावी का? याबाबत विचार केला जात असून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यात कोरोनाची परिस्थिती कशी असेल यावरच सर्व काही अवलंबून असणार आहे. 

हे पण वाचा - ...आणि त्या तीसवर्षीय तरुणीच्या मदतीसाठी पोहोचली व्हाईट आर्मी

 

खाजगी शाळांनी एलकेजीसाठी फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रवेश प्रक्रिया राबविली होती. मात्र शाळा सुरु न झाल्याने प्रवेश प्रक्रियाही रखडली आहे. त्यामुळे एलकेजी प्रवेशाबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर आरटीई प्रवेशाची यादी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्‌यात जाहीर केली जाणार आहे. शाळा लवकर सुरु झाल्या नाहीत तर ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. मात्र याबाबत अनेक अडचणी येत असल्याने ऑनलाईन शिक्षण देतानाही अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे वेळेत शाळा सुरु होणे आवश्‍यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 120 days to pay for school in karnataka