स्वॅब टेस्टिंगमध्ये ढिलाई ! शहरातील अवघ्या 40 जणांचेच आले रिपोर्ट; आठ पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Tuesday, 14 July 2020

ठळक बाबी... 

  • टेस्टिंग लॅबची क्षमता पाचशेपर्यंत असतानाही मंगळवारी अवघ्या 40 जणांचे आले रिपोर्ट 
  • आतापर्यंत शहरातील 16 हजार 192 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरात आतापर्यंत आढळले तीन हजार 345 कोरोना पॉझिटिव्ह; मृतांची संख्या 309 
  • एकूण बाधितांपैकी एक हजार 841 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 195 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
  • रुग्णांच्या संपर्कातील सर्वच व्यक्‍तींचे स्वॅब घेऊन टेस्टिंगसाठी पाठविले; रिपोर्ट येण्याचा वेग झाला कमी 

सोलापूर : शहरातील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींची संख्या तीनशेहून अधिक असतानाही मंगळवारी (ता. 14) अवघ्या 40 व्यक्‍तींचेच अहवाल महापालिकेस प्राप्त झाले. त्यानुसार आठ व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या असून तिघांचा मृत्यू झाला आहे. आता शहरातील एकूण रुग्णांची संख्या तीन हजार 345 झाली असून मृतांची संख्या 309 झाली आहे. 

'या' ठिकाणी सापडले नवे रुग्ण 
दमाणी नगर (लक्ष्मी पेठ), जानकी नगर (जुळे सोलापूर), रेल्वे क्‍वार्टर (मोदी), डीआरएम ऑफिसजवळ (रेल्वे लाईन), मंत्री चंडक (विजयपूर रोड), बसवेश्‍वर नगर, हत्तुरे नगर (होटगी रोड), कर्णिक नगर येथे आज एकूण आठ नवे रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे पाच्छा पेठेतील 80 वर्षीय पुरुष, मडकी वस्ती येथील 65 वर्षीय पुरुष आणि आंबेडकर नगर (कुमठा नाका) येथील 84 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

स्वॅब कलेक्‍शन पूर्ण मात्र रिपोर्टसाठी होतोय विलंब 
शहरातील ज्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍ती आहेत, त्यांचे स्वॅब कलेक्‍शन पूर्ण झाले आहे. रिपोर्टसाठी ते स्वॅब सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले परंतु, त्यांचा वेग कमी झाल्याने रिपोर्ट प्रलंबित राहिले आहेत. 
- डॉ. शितलकुमार जाधव, प्रभारी आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

ठळक बाबी... 

  • टेस्टिंग लॅबची क्षमता पाचशेपर्यंत असतानाही मंगळवारी अवघ्या 40 जणांचे आले रिपोर्ट 
  • आतापर्यंत शहरातील 16 हजार 192 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरात आतापर्यंत आढळले तीन हजार 345 कोरोना पॉझिटिव्ह; मृतांची संख्या 309 
  • एकूण बाधितांपैकी एक हजार 841 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 195 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
  • रुग्णांच्या संपर्कातील सर्वच व्यक्‍तींचे स्वॅब घेऊन टेस्टिंगसाठी पाठविले; रिपोर्ट येण्याचा वेग झाला कमी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 40 people in the Solapur city reported eight positive and three deaths