esakal | बेळगावात मराठी शाळा इमारतीत कन्नड शाळेने थाटला संसार
sakal

बोलून बातमी शोधा

only marathi schools outrage of kannada schools in belgaum

शिक्षण खात्याचे धोरण व मराठी शाळेवरील या अतिक्रमणाचा मराठी भाषकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. 

बेळगावात मराठी शाळा इमारतीत कन्नड शाळेने थाटला संसार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शाळेला जागा उपलब्ध नसल्याने एक महिन्यासाठी विद्यार्थ्यांना बसण्यास जागा उपलब्ध करुन द्या, असे कारण देत संभाजीनगरातील कन्नड शाळा वडगावमधील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 मध्ये भरविण्यात आली. मात्र, दोन वर्षे झाली तरी कन्नड शाळेसाठी स्वतंत्र इमारत मिळालेली नाही. तसेच पूर्व प्राथमिक असलेल्या या कन्नड शाळेला उच्च प्राथमिकचा दर्जा देत वर्ग वाढविले जात आहेत. शिक्षण खात्याचे धोरण व मराठी शाळेवरील या अतिक्रमणाचा मराठी भाषकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. 

शहरातील अनेक मराठी शाळांमध्ये कन्नड शाळांचे स्थलांतर करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. याबाबत मराठी भाषकांतून तीव्र विरोध झाल्यानंतरही तीन शाळांमध्ये कन्नड शाळा भरविली जात आहे. शहरातील इतर सरकारी मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असली तरी 100 हून अधिक वर्षांचा इतिहास लाभलेल्या सरकारी मराठी मुलींची शाळा क्रमांक 5 मध्ये मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. 

हेही वाचा -  मातीत माती मिसळली की, मोती पिकवता येतात ; उंच माळरानावर पिकवली शेती

दोन वर्षांपूर्वी संभाजीनगरमध्ये भाडोत्री इमारतीत असलेल्या कन्नड पूर्व प्राथमिक शाळेला इमारत नसल्याचे सांगत मराठी शाळेत काही वर्ग भरविण्यात आले. याची माहिती मिळताच पालक व मराठी भाषकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी पालक व रहिवाशांची भेट घेत फक्‍त एक वा दोन महिन्यांसाठी शाळा भरविली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, दोन वर्षे उलटली तरी अद्याप शाळेचे स्थलांतर केलेले नाही. उलट पूर्व प्राथमिक शाळेला उच्च प्राथमिक शाळेचा दर्जा दिल्याने सहावी व सातवीचे वर्ग वाढले आहेत. त्यामुळे, शाळेतील अधिक वर्ग द्यावे लागणार आहेत. याची पालकांनी दखल घेण्याची गरज आहे. 

"शाळा सुधारणा कमिटी व पालकांनी मराठी शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबत प्रशासनाकडे सर्वानी मिळून पाठपुरावा करुन कन्नड शाळेसाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करुया. मराठी शाळांच्या इमारतीत कन्नड शाळांचे स्थलांतर योग्य नाही. याबाबत आवाज उठविला जाईल."

- रमेश गोरल, जिल्हा पंचायत सदस्य  

हेही वाचा - बेळगाव :  एप्रिल ते ऑक्‍टोबरची आकडेवारी; २५ बाधित गर्भवती, ४९ प्रसूती यशस्वी
 

संपादन - स्नेहल कदम