esakal | जत तालुक्‍यात खुलेआम गांजा लागवड; कारवाई किरकोळ
sakal

बोलून बातमी शोधा

Open marijuana cultivation in Jat taluka; no Action taken

जत तालुक्‍यातील पूर्व भागातील सीमावर्ती भागात अवैधरित्या गांजा व मटका मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे.

जत तालुक्‍यात खुलेआम गांजा लागवड; कारवाई किरकोळ

sakal_logo
By
राजू पुजारी

संख (जि. सांगली) ः जत तालुक्‍यातील पूर्व भागातील सीमावर्ती भागात अवैधरित्या गांजा व मटका मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे. अनेक ठिकाणी मका, ऊस, तुरी या पिकांमध्ये गाज्यांची खुलेआम लागवड केली जात आहे. गांजा तस्करांवर किरकोळ कारवाई वगळता मोठी कोणतीही कारवाई न झाल्याने गांज्याचे उत्पादन सुरूच आहे. 

जत तालुक्‍यातील उत्पादित झालेल्या गांजा कर्नाटक व इतर राज्यात विक्री केला जातो. सीमावर्ती भागात चेक पोस्ट असूनही पोलिसांचे नियंत्रण नसल्याने इतर राज्यात गांजा तस्करी होत असते. महिन्यापूर्वी संख येथे ऊस व तुरीमध्ये गांजाचे लागवड करण्यात आलेल्या पावणेसहा लाख रुपयांचे गांजा उमदी पोलिसांनी जप्त केला.

जत तालुक्‍यात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने अडगळीच्या ठिकाणी गांजाची विक्री केली जात आहे. जत तालुक्‍यातील उत्पन्न केलेल्या गांजाची सीमावर्ती भागात गोदामे होती. मात्र महाराष्ट्र - कर्नाटक पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने मिरजेत गांजा विक्री आणि साठ्याचे केंद्र करण्यात आले आहे. पूर्वी जत आणि सीमा भागातून होणारी गांज्याची तस्करी आता सर्रास मिरजेतून होत आहे.

निर्णयातून हैदराबाद मुंबई-पुण्याकडे गांजा पाठवला जातो कर्नाटक मार्ग त्याची तस्करी केली जाते असल्याचे सांगितले जाते. आता नवीन आलेले पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जत व पूर्व भागात विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

कोरोनाच्या काळातही मटका तेजीत 
सध्या राज्यात कोरोना धुमाकूळ घातले असले तरी मुंबई, कल्याण, मिलन नाईट यासारखे अवैधरित्या मटका मात्र तेजीत सुरू आहे. कारवाईच्या भीतीने मटका घेणारे एजंट मोबाईलच्या माध्यमातून घेतली जात आहेत. तेही आठवडा उधारीवर आठवडा संपला की देणेघेणे केली जात आहेत. मटकाचे आहारी मध्ये अनेक लोक यामध्ये गुंतले आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत .एकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने जत तालुक्‍यात अवैध धंदे फोफावत आहेत. 

संपादन : युवराज यादव