"केकताड'तून नवोदित कलाकारांना संधी 

अनिलदत्त डोंगरे
Monday, 21 December 2020

"केकताड' हा सिनेमा ग्रामीण भागातील वास्तवतेवर प्रकाशझोत टाकणारा आहे. त्यात ग्रामीण भागातील अधिकाधिक कलाकारांना संधी दिली आहे, अशी माहिती लेखक, दिग्दर्शक शशिकांत तुपे यांनी केले.

खानापूर : "केकताड' हा सिनेमा ग्रामीण भागातील वास्तवतेवर प्रकाशझोत टाकणारा आहे. त्यात ग्रामीण भागातील अधिकाधिक कलाकारांना संधी दिली आहे, अशी माहिती लेखक, दिग्दर्शक शशिकांत तुपे यांनी केले. जाधववाडी (ता. खानापूर) येथे रुद्रा युनिक क्रिएशन, सारनाथ इंटरनॅशनल आणि ओजस्वी मल्टिमीडिया निर्मित "केकताड' या सामाजिक विषयावरील मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. त्यावेळी त्यांनी "सकाळ'शी संवाद साधला. 

ते म्हणाले,""खानापूर तालुका निसर्गसंपन्न आहे. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी चित्रीकरण करण्यास चांगला वाव आहे. या तालुक्‍यातील अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. ग्रामीण व्यवस्थेचे वास्तव मांडणार हा सामाजिक विषयावरील चित्रपट आहे.'' 

अभिनेते प्रवीण जाधव म्हणाले,""ग्रामीण भागात अनेकांच्या अंगी कला आहे. त्याला वाव देण्याचे काम या चित्रपटाच्या माध्यमातून झाले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करेल.'' 
निर्माते प्रवीण जाधव, दिलीप हांडे, अभिनेते रंगराव घागरे, इंद्रसिंह रजपूत, कैलास पानसरे प्रमुख उपस्थित होते. 

गुंडा पाटील यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. सहायक दिग्दर्शक संतोष लोखंडे, कॅमेरामन सुनील वानखेडे, मेकअपमन सलिका पठाण, लाईटमन अदिल, कलाकार ज्ञानेश्वरी शिंदे, प्रज्ञा पाटील, वैशाली जाधव, वैशाली तिवडे, जया पाटील, मानसी जाधव, दीपक सावंत, रंगराव घागरे, विजय देवकुळे, गुंडा पाटील, सुभाष पवार, शंकर शेडगे, शिवाजीराव चौगुले, डॉ. शैलेश माने, दीपक पांढरबळे, योगेश चव्हाण, विजय जावीर, ऋतिक बोले, सूरज कांबळे, साऊंड रेकॉर्डर प्रतीक दास, स्टील फोटोग्राफर किरण धेंडे, आकाश जगदाळे, प्रदीप जाधव, सुनील जाधव, रोहन जाधव उपस्थित होते.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity for budding artists from "Kekatad"