पवारांनी दिलेल्या संधीमुळे महिलाही आपले कतृत्व सिध्द करू लागल्या

हुकूम मुलाणी
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

मंगळवेढा - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महिलांना राजकारणातील विविध पदावर संधी दिल्याने महिलाही आपले कतृत्व सिध्द करू लागल्या असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी व्यक्त केले. तालुक्यातील भाळवणी ते राष्ट्रवादीच्या तालुका महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी रेश्मा गुंगे यांची निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी मुख्याध्यापिका धनश्री मिसाळ, शुभांगी कोरे, राणी पाटील, शोभा जाधव, माणिक गुंगे, कांतीलाल इरकर, विकास साखरे, दत्तात्रय साखरे विजय जाधव, संजय जाधव आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना नगराध्यक्षा माळी म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेसने महिला नगराध्यक्ष या राखीव पदावर आपणाला संधी दिल्याने शहराच्या विकासात योगदान देण्याचे भाग्य मिळाले यात शहरवासीयांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शहराच्या विकासासाठी विविध कामे करता करता आली. अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये महिला देखील प्रभावीपणे काम करत आहेत त्यातून त्यांना समाजसेवा करण्यासाठी एक संधी मिळत आहे आणि या संधीचा फायदा घेऊन महिलांनी आपला नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. यावेळी कांतीलाल विरकर धनश्री मिसाळ रेश्मा गुंगे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश पाटील यांनी मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the opportunity given by Pawar, the women started to prove their dedication