केशरी कार्डधारकांना पुन्हा दोन महिने सवलतीचे धान्य 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 9 July 2020

सांगली,  ः केंद्राने गरीबांना पाच महिने मोफत धान्य वितरणाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनेही राज्यातील केशरी कार्डधारकांना जुलै व ऑगस्ट महिन्यांसाठी सलवतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सांगली जिल्ह्यातील दोन लाख 18 हजार कार्डावरील 10 लाख 38 हजार लोकसंख्येला फायदा होणार आहे. 

सांगली,  ः केंद्राने गरीबांना पाच महिने मोफत धान्य वितरणाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनेही राज्यातील केशरी कार्डधारकांना जुलै व ऑगस्ट महिन्यांसाठी सलवतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सांगली जिल्ह्यातील दोन लाख 18 हजार कार्डावरील 10 लाख 38 हजार लोकसंख्येला फायदा होणार आहे. 

राज्य सरकारनेही एप्रिल, मे व जुन 2020 या कालावधीत सवलतीच्या दरात म्हणजे 12 रुपये किलो दराने तांदूळ दोन किलो आणि 8 रुपये किलो दराने तीन किलो गव्हू दिला होता. राज्याने याच प्रमाणात जुलै व ऑगस्ट महिन्यांसाठी धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर केंद्र सरकरने गरीबांना येत्या पाच महिन्यांसाठी मोफत पाच किलो तांदूळ किंवा गहू आणि एक किलो हरभरा डाळ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. जिल्ह्यातील चार लाख शिधापत्रिका धारकांना 48 हजार 470 टन धान्य मोफत मिळणार आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत धान्याबरोबरच प्रत्येक रेशन कार्डवर एक किलो डाळही मोफत दिली मिळणार आहे. 
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दोन प्रकारच्या कार्डधारकांना धान्य वितरण करण्यात येते. यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय धान्य योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित धान्य वितरण करण्यात येते. जिल्ह्यात 3 लाख 94 हजार 227 कार्डधारक या योजनेमध्ये आहेत. त्यांना 9 हजार 300 टन धान्य आणि 3.94 टन डाळीचे वाटप होणार आहे. 

पॉईटर... 
 राज्यातील रेशन दुकाने-52 हजार 438 
 जिल्ह्यतील दुकाने 1356 
............. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orange card holders again get two months discounted grain