सर्दी, ताप असल्यास विद्यार्थ्यांना सुटी....

An order from a school attendant should be given to a child who has a cold, fever and cough in karnataka
An order from a school attendant should be given to a child who has a cold, fever and cough in karnataka
Updated on

बेळगाव - कोरोनाबाबत कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार शाळेत येणाऱ्या एखाद्या मुलाला सर्दी, ताप, खोकला झाला असल्यास त्यांना सुटी द्यावी, असा आदेश शिक्षण खात्याने आज बजावला आहे. असा त्रास होत असेल तर शिक्षकांनीही सुटी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

शिक्षण खात्याने मंगळवारी राज्यातील सर्व सरकारी अनुदानित व विनाअनुदानित शाळांसाठी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार सर्दी, ताप, खोकला असल्यास त्यांना सुट्टी देण्यात यावी, असे कळविले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनामुळे भितीचे वातावरण पसरले असून देशाच्या काही भागातही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची लक्षणे स्वाईन फ्लूसारखी असून सर्दी, खोकला, 
ताप यापासून त्याचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळेच सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना सुट्टी घेण्यापासून रोखू नये. तसेच ज्या विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यांना आजार कमी झाल्यानंतरच पुन्हा शाळेत येण्याची सूचना करावी. विद्यार्थी वसतीगृहात किंवा इतर ठिकाणी राहून शिक्षण घेत असल्यास त्या विद्यार्थ्यासाठी विशेष खोलीची सोय करावी, असेही निर्देशही देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांनी स्वच्छ हात धुवावेत. तसेच सर्दी, ताप आल्यास तातडीने डॉक्‍टरांशी संपर्क साधावा. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करावे अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. सध्या परीक्षांचा हंगाम सुरु झाला असून विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत आहेत. अशावेळी सर्दी, ताप, खोकला असल्यास सुट्टी देण्यास सांगण्यात आल्याने काही विद्यार्थ्यांसाठी अडचण ठरणार आहे. मात्र, शिक्षण खात्याने या रोगाची लागण होऊ नये यासाठी मार्गदर्शकसूचीच जाहीर केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com