नागरिकांना पेट्राेल, डिझेल मिळणार नाही; काेणाला मिळणार वाचा सविस्तर

नागरिकांना पेट्राेल, डिझेल मिळणार नाही; काेणाला मिळणार वाचा सविस्तर

सातारा ः काेराेना व्हायरस (काेविड १९) प्रादर्भाव राेखण्यासाठी त्यावर तात्काळ नियंत्रणे करणे व संसार्गात अधिक वाढ हाेवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक म्हणून सातारा जिल्ह्यातील पेट्राेल पंपावर पेट्राेल भरण्यासाठी येणारी दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनामध्ये पेट्राेल भरण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी कर्मचारी व्यक्ती, काेराेना नियंत्रण व निर्मुलनासाठी कार्य करणारी व्यक्ती, अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खाजगी व्यक्ती, वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती यांनाच पेट्राेल मिळेल अथवा द्यावे.

तसेच संबंधित व्यक्ती यांनी देखील एकादाच पेट्राेल टाकी भरुन घेणे बंधनकारक आहे असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश केले आहेत. याबाबतच्या सूचना सिंह यांनी सातारा जिल्हा पेट्राेल डिझेल पंप असाेसिएशन यांना दिल्या आहेत.


सातारा जिल्ह्यात दाेन रुग्णांचे अहवाल पाॅझिटेव्ह आले आहेत. जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पाेलिस कार्यरत आहेत.


हेही वाचा : सातारा जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या पाेहचली दाेनवर

दरम्यान वृत्तपत्रांद्वारे कोरोनाचा प्रसार होतो, असे सरकारी यंत्रणेचे नाव वापरून सोशल मीडियावर खोटे मेसेज फिरवले जात आहेत. त्यामध्ये सत्यता नाही. वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा प्रसार अजिबात होत नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. 

वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा प्रसार होतो, त्यामुळे वृत्तपत्रे घेऊ नका, अशा आशयाचा मेसेज सरकारी यंत्रणांचे व जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव वापरून सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. त्यावरून वाचक व सामान्य जनतेमध्ये गैरसमज निर्माण केले जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. असे मेसेज फिरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी साताऱ्यात सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी व सातारा जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे जाहीर स्पष्टीकरण दिले.

वाचा : Coronavirus : दुबईवरुन सातारला आलेल्या महिलेस काेराेनाची लागण

ते म्हणाले, ""सोशल मीडियावरून एक बातमी प्रसारित केली जात आहे. त्यात जिल्हाधिकाऱ्यांचे व जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव वापरून वृत्तपत्रांद्वारे कोरोनाचा प्रसार होतो, असा चुकीचा मेसेज फिरवला जात आहे. वास्तविक कोणत्याही सरकारी यंत्रणेने अशा पद्धतीचे मेसेज केलेले नाहीत किंवा वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो असा संदेश सरकारी यंत्रणांनी फिरवलेला नाही, त्यामुळे तो मेसेज खोटा व फेक आहे. त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये.'' 

सोशल मीडियावर अशा पद्धतीने खोटे अथवा फेक मेसेज देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. वृत्तपत्रे या संकट काळात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. जनजागृतीचे मोठे काम वृत्तपत्र माध्यमांतून होत आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनीही सात अत्यावश्‍यक गरजांमध्ये वृत्तपत्रांचा (मीडियाचा) समावेश असल्याचे म्हटले आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. 
जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, ""वृत्तपत्र माध्यमांबाबत अशा पद्धतीने कोण खोटे मेसेज फिरवत असेल, तर माध्यमांच्या प्रतिनिधींनी तक्रार द्यावी. आम्ही गुन्हे दाखल करू. सात अत्यावश्‍यक गरजांमध्ये वृत्तपत्र व मीडियाचा समावेश असल्याने कोरोना निर्मूलनाच्या मोहिमेमध्ये वृत्तपत्रांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्हाला आदर आहे.'' 

दरम्यान, एसटी बस स्थानकात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वृत्तपत्र विक्रेत्यांनीही कोरोनापासून संसर्ग होऊ नये, यासाठी सॅनिटायझर व मास्क यांचा वापर करत असल्याचे सांगितले. 

माहिती महासंचलनालयाकडूनही "फेक वृत्त'ची मोहोर राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या व जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव वापरून तयार केलेल्या खोट्या व्हॉट्‌सऍप मेसेजचे साताऱ्यातील पत्रकारांनी पोस्टमार्टेम केले. माहिती महासंचलनालयाच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरही हा खोटा मेसेज पडल्यानंतर माहिती महासंचलनालयानेही ते "फेक वृत्त' असल्याची मोहोर उमटवली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com