सांगलीत जिल्ह्यात लवकरच सुरु होणार सेंद्रीय मॉल

Organic mall to be started soon in Sangli district
Organic mall to be started soon in Sangli district
Updated on

सांगली : जिल्ह्यात सांगली शहर आणि पेठ येथे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने सेंद्रीय मॉल लवकरच सुरु होईल. सांगलीतील मॉल महिन्याभरात सुरु होणार आहे. नागरिकांना रासायनिक अंश विरहीत भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, फळांसह ज्वारी, बाजरी, गहू आदी उपलब्ध होणार आहे. दोन्ही सेंद्रीय मॉल चोखंदळ ग्राहकांसाठी पर्वणी ठरणार आहेत. एकाच छताखाली सर्व मिळणार असल्याने ग्राहकांच्या दृष्टीने आरोग्यादायी ठरणार आहे. 

सध्याच्या भाजीपाल्याला चवच नाही. टॉमेटो, ढबू खाल्याने त्रास होतोय, द्राक्ष खाल्यानंतर लगेच गळा धरतोय, अगदी उत्पादक शेतकरी स्वतः बाजारात विक्रीसाठी आणलेला माल घरी वापरात नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही शेतकरी तर खाण्यासाठी आणि विक्रीसाठी असे दोन स्वतंत्र भाग करुनच मालाचे उत्पादन घेतात. आता ग्राहकांना केवळ भाजीपालाच नव्हे तर फळे, द्राक्ष, डाळिंब, केळी, ज्वारी, बाजरी, गहू आणि कडधान्येही उपलब्ध होतील. 

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सांगलीतील सेंद्रीय मॉलसाठी निविदा काढली आहे. यामध्ये सेंद्रीय शेतकरी गट किंवा शेतकरी कंपन्यांकडून विक्रीसाठी निविदा भरावयाची आहे. सबंधित कंपनी किंवा गटाकडून शेतकऱ्यांचा आणणला सर्व माल सेंद्रीय प्रमाणित असेल, याची लेखी हमी द्यावी लागणार आहे. किंबहून शेतकऱ्यांचा माल सेंद्रीय तपासणी करुनच या ठिकाणी आणावा लागणार आहे. 

रेसिड्यू फ्री प्रयोगशाळेकडे लक्ष... 
सांगलीत रासायनिक अंश विरहीत फळे, भाजीपाला मॉल सुरु होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी सध्या सेंद्रीय माल विकतात मात्र, त्यासाठीची तपासणी प्रयोगशाळा पुणे येथे आहे. परिणामी अनेक शेतकरी सेंद्रीय उत्पादने खुल्या बाजारात विक्री करतात. त्यांना चांगला दर मिळत नाही. शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेवून कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी लवकरच अद्ययावत प्रयोगशाळा सांगलीत सुरु होत असल्याचे नुकतेच स्पष्ट केले. यासाठी 25 कोटी खर्च अपेक्षीत आहे. शेतकरी आणि ग्राहकांची यामुळे सोय होणार आहे. 

दृष्टीक्षेपात सेंद्रीय मॉल... 
- मॉलचे ठिकाण ः सांगली विजयनगर, जिल्हा न्यायालयामागे 
- विजयनगर मॉलचे क्षेत्रफळ- 1500 चौरस फुट 
- मॉलची सर्व बांधकामासह सर्व तयारी पूर्ण 
- शेतकरी गट किंवा कंपनीकडे जबाबदारी 
- पेठ येथे 1500 चौरस फुटाची जागा 
- पेठचे काम सध्या अपूर्ण 

सेंद्रीय मॉलसाठी कृषी विभागाने निविदा काढलेली आहे. चार दिवसात ती प्रसिध्द होईल. त्यासाठी सेंद्रीय शेतकरी गट तसेच कंपन्यांना यामध्ये सहभागी होता येईल. अधिक तपशील नोटीसीत असेल. येत्या महिनाभरात सांगलीचा मॉल सुरु होईल. 
- बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सांगली.

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com