क्रांती ज्योती परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन

राजकुमार शहा 
गुरुवार, 5 जुलै 2018

सर्व जाती धर्माचा समावेश असलेल्या या परिषदेमुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय सामिकरणे बदलाची चिन्हे आहेत. राज्यात माळी समाज मोठा आहे. या परिषदेच्या पदाधिकारी निवडीत जरी इतर समाजाला जरी स्थान दिले असले तरी या परिषदेचा मुख्य हेतु तर माळी समाजातील युवकांचे संघटन असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. 

मोहोळ - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अन्य राष्ट्रवादीचे माजी मंत्री व पदाधिकारी येत्या 14 जुलै ला मोहोळ येथे क्रांती ज्योती परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. सर्व नियोजन या परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले आहे. यामुळे मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. अशा प्रकारचे राज्यस्तरीय अधिवेशन मोहोळ येथे प्रथमच होत आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  
 
सर्व जाती धर्माचा समावेश असलेल्या या परिषदेमुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय सामिकरणे बदलाची चिन्हे आहेत. राज्यात माळी समाज मोठा आहे. या परिषदेच्या पदाधिकारी निवडीत जरी इतर समाजाला जरी स्थान दिले असले तरी या परिषदेचा मुख्य हेतु तर माळी समाजातील युवकांचे संघटन असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. सध्या माळी समाजातील अनेक तरुण या बदलाच्या प्रवाहात सामील झाले आहेत. माळी समाजाचे नेते छगन भुजबळ ही मोहोळला येत असल्याने माळी समाजाचे मोठे शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

समाज संघटन करून न्याय मागण्यासाठी तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवुन सर्वसामान्याना दिलासा देण्याचे काम परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मोहोळ येथे येण्याने राष्ट्रवादीला येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. तर राष्ट्रवादी पासुन दुरावलेली काही मंडळी पुन्हा राष्ट्रवादीच्या प्रवाहात येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिवेशनासाठी सुमारे दहा ते बारा हजार कार्यकर्ते हजेरी लावतील, असा अंदाज प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी व्यक्त केला आहे.
 
वरील नेत्यांसह खा. विजयसिह मोहिते पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री दिलीप सोपल, माढ्याचे आमदार बबन दादा शिन्दे, आण्णा डांगे बापु सो भुजबळ, माजी खा. रणजीतसिंह मोहिते पाटील, रश्मी बागल, माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिपक साळुंखे, संतोष पवार, माजी आमदार राजन पाटील, जिप सदस्य उमेश पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, राजु बापु पाटील आदींसह जिल्हयातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organizing the first state convention of Kranti Jyoti Parishad